शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्तनांच्या कॅन्सरसाठी आता ऑपरेशनची गरज नाही, समोर आला ‘हायड्रोजेल’चा रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 09:48 IST

सध्या कॅन्सरवर केल्या जाणाऱ्या पारंपरिक उपचारांच्या तुलनेत या संशोधित पद्धतीमुळे रुग्णांवर होणारे दुष्परिणाम फारच कमी प्रमाणात असतील. कोलकाता येथील बोस इन्स्टिट्यूटच्या सहकार्यातून हे संशोधन करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : आयआयटी गुवाहटीतील संशोधकांनी स्तनांच्या कॅन्सरवर गुणकारी ठरणारे हायड्रोजेल विकसित केले असून, ते इंजेक्शनच्या माध्यमातून देता येऊ शकेल. विशेष म्हणजे या उपचाराचे दुष्परिणामही अत्यंत कमी असतील. या संशोधनामुळे आगामी काळात कॅन्सरग्रस्त अशा रुग्णांना किमोथेरपी किंवा शस्त्रक्रियेची गरज राहणार नाही.

सध्या कॅन्सरवर केल्या जाणाऱ्या पारंपरिक उपचारांच्या तुलनेत या संशोधित पद्धतीमुळे रुग्णांवर होणारे दुष्परिणाम फारच कमी प्रमाणात असतील. कोलकाता येथील बोस इन्स्टिट्यूटच्या सहकार्यातून हे संशोधन करण्यात आले आहे. 

उपचारपद्धतीचे असे आहे वैशिष्ट्य- या हायड्रोजेलच्या उपचारांमध्ये ज्या ठिकाणी गाठ आहे, त्या अचूक ठिकाणी औषधे थेट पोहोचू शकतील.- त्यामुळे कॅन्सरग्रस्त पेशींचा इलाज होऊ शकेल. यात निरोगी पेशींना अपाय होणार नाही.

एक थ्री-डी नेटवर्कहे हायड्रोजेल पाण्यावर आधारित एक थ्री-डी नेटवर्क असून, द्रवपदार्थ शोषून तो राखून ठेवण्यात ते सक्षम आहे.याची रचना जिवंत पेशींची हुबेहूब नक्कल करते. जैविक वैद्यकीय उपचारांत या पेशी उपयुक्त ठरतात.

हा शोधप्रबंध रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या ‘मटेरिअल्स होरायझन्स‘मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

किमोथेरपीपासून मिळेल दिलासा- आयआयटी गुवाहटीतील रसायनशास्त्र विभागाचे प्रोफेसर देवप्रतिम दास यांच्यानुसार, सध्या जगभर कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत असून, यावर किमोथेरपी किंवा शस्त्रक्रियेसारख्या पद्धतींच्या उपचारांवरही खूपच मर्यादा आहेत.- अनेकदा कॅन्सरची गाठ शस्त्रक्रियेनंतरही काढता येत नाही. शिवाय, केमोथेरपीमध्ये कॅन्सरग्रस्त पेशींसह चांगल्या पेशींचाही नाश होत असल्याने त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.- या नव्या तंत्रामुळे कॅन्सर रुग्णांना दिलासा मिळू शकेल. उपचार सुसह्य ठरतील.  

टॅग्स :Breast Cancerस्तनाचा कर्करोगHealthआरोग्य