आला उन्हाळा, आरोग्य संभाळा... सल्ला : जास्तीत जास्त पाणी प्या, उन्हात जाणे टाळा...
By Admin | Updated: March 22, 2016 00:39 IST2016-03-22T00:39:41+5:302016-03-22T00:39:41+5:30
जळगाव : उन्हाळा म्हणजे उष्माघातासह जुलाब व इतर गंभीर आजारांना निमंत्रणच असते. त्यामुळे आता उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून आरोग्य संभाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

आला उन्हाळा, आरोग्य संभाळा... सल्ला : जास्तीत जास्त पाणी प्या, उन्हात जाणे टाळा...
ज गाव : उन्हाळा म्हणजे उष्माघातासह जुलाब व इतर गंभीर आजारांना निमंत्रणच असते. त्यामुळे आता उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून आरोग्य संभाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. खान्देशातील उन्हाळ्यातील तापमान म्हणजे नकोसे वाटते. इतर शहरांमधून आलेल्या नागरिकांना तर येथे आल्यावर हमखास आजार होतात. जळगावकरांना याची सवय झाली असली तरी झाडांची संख्या कमी होत असल्याने दिवसेंदिवस येथील तापमान वाढतच असल्याने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. गंभीर आजारास निमंत्रण...उन्हाळा म्हटला म्हणजे पाण्यापासून होणार्या अनेक आजारांना निमंत्रण असते. या दिवसात सर्वात गंभीर फटका बसतो तो म्हणजे उष्माघाताचा. भर उन्हात बाहेर फिरल्याने चांगली प्रकृती असलेल्या व्यक्तीलादेखील उन्हाचा फटका बसून उष्माघात होऊ शकतो. याशिवाय उन्हाळ्यात तहान वाढल्याने आपण बाहेरचे पाणी घेतो. मात्र ते कसे आहे, याची खात्री होत नाही व त्यातून जुलाब, उलट्या असा त्रास होऊन नंतर गॅस्ट्रो सारख्या गंभीर आजारापर्यंत परिस्थिती जाते. या शिवाय कावीळ, डायरिया हे अजारदेखील बळावतात. अशी घ्या काळजी....-जास्त पाणी पिऊन शरीरातील पाणी पातळी कायम ठेवावी. -शक्यतो जी कामे आहे ती सकाळी १० ते ११ वाजे दरम्यान पूर्र्ण करावी. -भर उन्हात जाऊ नये, महत्त्वाचे काम असेल तरच दुपारी बाहेर पडावे.-बाहेर जाताना पांढरे सुती कपडे घालावे, डोक्याला पांढरा रुमाल बांधावा, डोळ्याला गॉगल वापरावा. -घरी कुलरचा वापर करावा-मीठाचे पाणी अथवा लिंबू सरबतचे जास्त सेवन करावे. याशिवाय फळांचा रसही घ्यावा, टरबूज सारखे पाणीदार फळे खावी. -लहान मुलांना शक्यतो उन्हात नेऊ नये, त्यांना लगेच उन्हाचा फटका बसू शकतो. विशेषत: लग्न कार्यात जाताना मुलांना नेऊ नये. कोट..उन्हाळ्यामध्ये उष्माघात व इतर आजार होण्याची जास्त शक्यता असते. आरोग्यासाठी भरपूर पाणी प्यावे. उन्हापासून बचाव करावा.-डॉ. नरेंद्र चौधरी.या दिवसांमध्ये उन्हाचा सर्वांनाच त्रास होतो. उष्माघातासह गॅस्ट्रो, कावीळ, डायरिया सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो कामे सकाळीच पूर्ण करुन घ्यावी. दुपारी उन्हात जाणे टाळावे. -डॉ.डी.आर.जयकर.