सायकलिंग करा स्वस्थ राहा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 15:56 IST
एखादा रुग्ण आयसीयू मध्ये असल्यास त्याच्या आजारपणामुळे त्याचे स्रायू कमकुवत होत असतात. मात्र, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागातच सायकलिंगचा व्यायाम दिल्यास त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होण्यास मदत होते, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.
सायकलिंग करा स्वस्थ राहा !
एखादा रुग्ण आयसीयू मध्ये असल्यास त्याच्या आजारपणामुळे त्याचे स्रायू कमकुवत होत असतात. मात्र, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागातच सायकलिंगचा व्यायाम दिल्यास त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होण्यास मदत होते, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. शिवाय फिजिओथेरपिस्टने रुग्णांना सावधपणे सायकल चालविण्याचा व्यायाम देण्याची गरज असल्याचेही अभ्यासात निष्पन्न झाले आहे. अतिदक्षता विभागातील रुग्ण स्रायूंच्या कमजोरीमुळे कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम करण्यास असमर्थ असतात, असा सर्वसामान्यांचा समज आहे. मात्र, या रुग्णांना उपचार सुरू असलेल्या कक्षातच उपचारादरम्यान ३० मिनिटे सायकल चालविण्याचा व्यायाम देण्याची गरज असल्याचेही संशोधनात स्पष्ट केले. सायकल चालविण्याच्या व्यायामामुळे पाय आणि कमरेचा व्यायाम होतो. यामुळे पायाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. त्यामुळे रुग्णालयातून सुटल्यानंतरही रुग्ण आत्मविश्वासाने घरी जाऊ शकतात, असे मॅकमास्टर विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक मायकेल कोह यांनी सांगितले.गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात सायकल चालविण्याचा व्यायाम दिल्यास त्यांच्या प्रकृतीत निश्चित फरक पडेल, असेही संशोधकांनी म्हटले आहे. हे संशोधन पोल्स वन या मासिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.