ेस्वाइन फ्लूचे राज्यात ६ बळी
By Admin | Updated: September 4, 2015 22:45 IST2015-09-04T22:45:08+5:302015-09-04T22:45:08+5:30
पुणे : स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या दिवसागणिक वाढत असून गुरुवारी या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ६ वर गेली आहे. यामध्ये पुण्यातील एकाचा समावेश असून रायगड, ठाणे, औरंगाबाद येथील अनुक्रमे एक, तर सातारा येथील २ जणांचा समावेश आहे.

ेस्वाइन फ्लूचे राज्यात ६ बळी
प णे : स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या दिवसागणिक वाढत असून गुरुवारी या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ६ वर गेली आहे. यामध्ये पुण्यातील एकाचा समावेश असून रायगड, ठाणे, औरंगाबाद येथील अनुक्रमे एक, तर सातारा येथील २ जणांचा समावेश आहे. राज्यात गुरुवारी ७५६१ जणांची स्वाइन फ्लूच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. त्यातील ४१४ जणांना ऑसेलटॅमिवीर हे औषध देण्यात आले. दिवसभरात ६९ जणांना या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यातील २९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात १ जानेवारीपासून स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ६४३ झाली आहे.----------------------------