जंतनाशक मोहिमेचा आगर येथे प्रारंभ
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:17+5:302015-02-13T23:11:17+5:30
आगर : येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा प्रारंभ १० फेबु्रवारी रोजी जिल्हा परिषद सदस्य महादेवराव गवळे यांच्या हस्ते स्थानिक महात्मा फुले विद्यालयात करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणार्या जंतनाशक मोहिमेच्या प्रारंभानिमित्त आयोजित या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव यांनी मोहिमेत करावयाच्या कामांबाबत माहिती देऊन १ ते १९ वयोगटातील सर्वांनी जंतनाशकाच्या गोळ्या घेण्याचे आवाहन केले. यावेळी गवळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच गो.रा. पाटील व मुख्याध्यापक मोरखडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी हर्षाली ताडे, आरोग्य कर्मचारी बी.एस. वाकोडे, अश्फाक हुसेन, ओम पाकदाणे यांनी परिश्रम घेतले.(वार्ताहर)

जंतनाशक मोहिमेचा आगर येथे प्रारंभ
आ र : येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा प्रारंभ १० फेबु्रवारी रोजी जिल्हा परिषद सदस्य महादेवराव गवळे यांच्या हस्ते स्थानिक महात्मा फुले विद्यालयात करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणार्या जंतनाशक मोहिमेच्या प्रारंभानिमित्त आयोजित या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव यांनी मोहिमेत करावयाच्या कामांबाबत माहिती देऊन १ ते १९ वयोगटातील सर्वांनी जंतनाशकाच्या गोळ्या घेण्याचे आवाहन केले. यावेळी गवळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच गो.रा. पाटील व मुख्याध्यापक मोरखडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी हर्षाली ताडे, आरोग्य कर्मचारी बी.एस. वाकोडे, अश्फाक हुसेन, ओम पाकदाणे यांनी परिश्रम घेतले.(वार्ताहर)०००००००००००००००००००००००