शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

तुमच्या पायांच्या वेदनांमागचं कारण 'स्पायडर वेन्स' तर नाही?; 'असे' करा घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 10:49 IST

अनेकदा पायांमध्ये वेदना फक्त थकव्यामुळेच होत नाहीतर तर यामागे विविध कारणं दडलेली असतात. अनेकदा या समस्या पायाच्या वेन्स म्हणजेचं नसांशी निगडीत असतात. अशीच एक समस्या म्हणजे, 'स्पायडर वेन्स'.

(Image Credit : Women's Health.gov)

अनेकदा पायांमध्ये वेदना फक्त थकव्यामुळेच होत नाहीतर तर यामागे विविध कारणं दडलेली असतात. अनेकदा या समस्या पायाच्या वेन्स म्हणजेचं नसांशी निगडीत असतात. अशीच एक समस्या म्हणजे, 'स्पायडर वेन्स'. स्पायडर वेन्स लहान असून एकमेकांमध्ये अडकलेल्या असतात. यालाच  'टेलँजिक्टासिया' म्हणूनही ओळखलं जातं. लाल, जांभळा आणि निळ्या रंगाचा असतो. अनेकदा पाय किंवा चेहऱ्यावर या वेन्स दिसून येतात.  व्हेरिकोज वेन्स असलेल्या भागातच लांब आणि बारिक अशा स्पायडर वेन्स असतात. अतिरिक्त वजनाचा भाग या नसांवर आला की, त्यातील रक्तपुरवठ्याचा वेग मंदावतो. त्यामुळेच सकाळी उठल्यावर अनेकदा पायांना सुज आल्याचे जाणवते. साधारणतः वयाची पन्नाशी पार केलेल्या व्यक्तींमध्ये ही समस्या आढळून येते. पण अनेक तरूणांमध्येही या समस्येची लक्षणं दिसून येत आहेत. वाढणारं वय, गर्भनिरोधक गोळ्या, गर्भावस्था आणि वाढलेलं वजन किंवा लठ्ठपणा ही स्पायडर वेन्सची समस्या उद्भवण्याची कारणं आहेत. 

(Image Credit : Salud180)

यामुळे उद्भवते स्पायडर वेन्सची समस्या... 

पायांमध्ये अनेक वॉल्व असतात. जे रक्त हृदयाच्या दिशेने प्रवाहित करण्यासाठी मदत करतात. जेव्हा हे वॉल्व डॅमेज होतात. तेव्हा सूज येणं, वेदना होणं, थकवा, खाज येणं यांसारख्या लक्षणांसोबत ब्लड क्लॉट तयार होतात. त्यामुळे हृदयाच्या दिशेने होणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो. पायांना सूज येते. व्हेरिकोज वेन्समध्ये त्वचेच्या खालच्या भागात नसा वर येतात. त्याला स्पायडर वेन्स असंही म्हणतात. कारण या नसांचा आपापसांत अशाप्रकारे गुंता होतो. त्यामुळे या नसा एखाद्या कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे दिसतात. ही समस्या साधारणतः पायांमध्येच दिसून येते. 

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, स्पायडर व्हेन्सच्या समस्येपासून दूर राहायचं असेल तर संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. जंक फूड, अल्कोहोल, साखर, मीठ, आइस्क्रिम यांसारख्या पदार्थांचे अतिसेवन टाळावे. तसेच सैल कपडे घालावे, घट्ट चपला, मोजे घालू नयेत. एकाच जागी न बसता आजूबाजूला फिरून सतत शरीराची हालचाल आवश्यक आहे. एरंडेल तेलाने पायांच्या नसांवर बरचेवर मालिश करावी. तसेच ही समस्या वाढली असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 

हे घरगुती उपाय ठरतात फायदेशीर : 

हिरवा टोमॅटो 

हिरवा टोमॅटो स्पायडर व्हेन्सवर उपाय म्हणून अत्यंत फायदेशीर ठरतो. कारण स्पायडर वेन्समुळे प्रभावित झालेल्या भागांमध्ये हा टोमॅटो रक्तप्रवाह वाढवतो. तसेच हिरवा टोमॅटोच्या चकत्या कापून एखाद्या कापडाच्या सहाय्याने प्रभावित झालेल्या क्षेत्रांमध्ये बांधून ठेवा. समस्या काही प्रमाणात दूर होण्यास मदत होते. 

लसूण 

लसणामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि अ‍ॅन्टी-इंफ्लेमेटरी गुण असतात. लसणामधील अ‍ॅन्टीऑक्सिडं रक्तप्रवाह वाढविण्यासाठी त्याचबरोबर स्पायडर वेन्सची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. 

द्राक्षांच्या बियांचा अर्क

स्पायडर वेन्सपासून सुटका मिळवण्यासाठी द्राक्षांच्या बियांचा अर्क अत्यंत फायदेशीर ठरतो. या अर्कामध्ये बायोफ्लेवोनॉइड्स असतात. ज्यांना ओलिगोमेरिक प्रोएन्थोसाइनिडिन कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. हे बायोफ्लेवोनॉइड्स रक्तप्रवाह वाढविण्यासाठी मदत करतात. 

सफरचंदाचं व्हिनेगर 

स्पायडर वेन्सच्या समस्येवर सफरचंदाचं व्हिनेगर अत्यंत फायदेशीर ठरतो. एक स्वच्छ कापडाचा तुकडा सफरचंदाच्या व्हिनेगरमध्ये बुडवून प्रभावित क्षेत्रावर बांधून ठेवा. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. उत्तम उपायांसाठी ही प्रक्रिया दररोज 2 ते 3 वेळा करा. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार