शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

घामाच्या दुर्गंधीपासून झटपट सुटका मिळवण्याचे खास उपाय, दूर पळणार नाहीत लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 15:52 IST

अधिक घाम येणे अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे की विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंच्या संसर्गामुळे अति प्रमाणात घाम देखील येऊ शकतो. जाणून घेऊया जास्त घामापासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाय.

अधिक घाम येणे अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे की विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंच्या संसर्गामुळे अति प्रमाणात घाम देखील येऊ शकतो. हृदयाच्या झडपामध्ये जळजळ, हाडांशी संबंधित संक्रमण तसेच एचआयव्ही संसर्ग देखील असू शकतो. कोणतेही काम आणि व्यायामाशिवाय जास्त घाम येणे हृदयविकाराची चिन्हे असू शकते. तणाव, चिंता आणि भीतीमुळे अत्यधिक घाम येणे देखील होऊ शकते. जाणून घेऊया जास्त घामापासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाय.

भरपूर पाणी प्यातुम्हाला इतर व्यक्तींच्या तुलनेने जर जास्त घाम येत असेल तर भरपूर पाणी प्या. असे केल्याने तुमच्या शरीरात पाण्याची योग्य पातळी नियंत्रित राहिल. भरपूर पाणी प्यायल्याने हायपरडायड्रोसिसचा त्रास होण्यापासून बचाव केला जाऊ शकतो. तसेच तुम्ही दहि, कैरीचे पन्हं, ज्यूस, छास पिऊ शकता.

सॉफ्ट ड्रिंक्स टाळासॉफ्ट ड्रिंक्समुळे तुम्हाला थोड्यावेळासाठी बरे वाटते पण सॉफ्ट ड्रिंक्स शरीरासाठी घातक असतात. त्याएवजी तुम्ही तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवत रहा. साबणाचा वापर करू नका.

डेरी उत्पादनेतुम्ही डेरी उत्पादनांचा जास्त वापर केलात तर तुम्हाला ब्लॅक हेड्स, मुरुमांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे दुध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करा. दुध जास्त असणारी चहा, कॉफी टाळा त्या एवजी सोया किंवा बादाम मिल्क प्या.

फेसपॅक वापराघामामुळे त्वचा ऑईली होत असेल तर - त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी तुम्ही मुलतानी माती किंवा चंदनाचा फेस पॅक वापरू शकता. आठवड्यातून दोन वेळा हे मास्क चेहऱ्यावर लावा. यातील पोषक घटकांमुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होण्यास मदत मिळते. त्वचा टॅन झाली असल्यास कच्चे दूध, मुलतानी माती आणि ‌हळद एकत्रित पॅक तयार करून चेहऱ्याला आणि हातांनाही लावा. यामुळे टॅनिंग कमी होतं आणि रंग उजळण्यास मदत मिळेल.

बर्फ आणि सनस्क्रीनचा वापर करातुम्ही चेहऱ्यावर बर्फ चोळु शकता. यामुळे तुमच्या त्वचेची छिद्र बंद होऊन त्वचा टाईट होते. घरातून बाहेर निघण्यावेळी ३० मिनिटं आधी तुम्ही सनस्क्रीन लावू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स