शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कच्चे बदाम खाणं जास्त फायदेशीर असतं की भिजवून? जाणून घ्या फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 14:28 IST

बऱ्याचदा लोक कन्फ्यूज असतात की, बदाम कच्चेच खावेत की भिजवून? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

Raw almond vs soaked almond: बदाम खाणं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे तुम्हाला माहीत आहेच. कोणत्याही ऋतूमध्ये बदाम खाता येतात. पण काही लोकांना कच्चे बदाम पचवणं थोडं अवघड होत. ज्यामुळे सूज, गॅस आणि पोटाची समस्या होऊ शकते. बऱ्याचदा लोक कन्फ्यूज असतात की, बदाम कच्चेच खावेत की भिजवून? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

बदाम भिजवून खाणं जास्त फायदेशीर

बदाम रात्रभर किंवा काही तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. याने साल काढणंही सोपं होतं. तसेच बदाम भिजवून खाल्ले तर त्यातील पोषक तत्व मिळतात. तसेच भिजवलेले बदाम पचवणं सुद्धा सोपं होतं. कच्चे बदाम खाल तर पचन तंत्रासाठी समस्या होऊ शकते. त्यामुळे भिजवलेलेच बदाम खाणं चांगलं ठरतं. चला जाणून घेऊ भिजवलेल्या बदामाचे फायदे...

1) हृदयाचं कार्य सुधारतं

जर्नल ऑफ न्युट्रीशनच्या अहवालानुसार, बदामातील अँटीऑक्सिडंट शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृदयविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.

2) बॅड कोलेस्ट्रेरॉल’दूर करतात

आजकाल तणावग्रस्त जीवनशैली तसेच वेळी अवेळी खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढल्याने हृदयविकार जडण्याची समस्या बळावत आहे. बदामांमुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन ‘गुड’ कोलेस्ट्रॉल वाढतं. 

3) पचनशक्ती सुधारते

‘जर्नल ऑफ फूड सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. कारण भिजवलेल्या  बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

4) ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात 

ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’ यांच्यानुसार बदामातील ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. असे देखील या संशोधनातून पुढे आले आहे. विशेषतः 30 -70 वयोगटातील पुरूषांमध्ये हा फरक प्रामुख्याने आढळून आला.

5) वजन घटवण्यास मदत  

‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी रिलेटेड मेटॅबोलिक डिसऑर्डर’ यांच्या अहवालानुसार  बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य