नितळ आणि सुंदर त्वचेसाठी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 16:53 IST2017-09-08T16:51:06+5:302017-09-08T16:53:10+5:30

वाढत्या वयाला अटकाव घालण्यासाठी काही गोष्टी करण्याबरोबर काही टाळायलाही हव्यात..

for smooth and beautiful skin .. | नितळ आणि सुंदर त्वचेसाठी..

नितळ आणि सुंदर त्वचेसाठी..

ठळक मुद्देउन टाळलं पाहिजे, हे खरं, पण काही प्रमाणात आपल्या शरीराला उन मिळणं आवश्यकही असतं. त्यामुळे योग्य तेवढा सूर्यप्रकाश आपल्या शरीराला मिळू द्या.घरस्वच्छता असो किंवा वैयक्तिक स्वच्छतेसाठीच्या घटकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थ असतात. त्यांच्या संपर्कात आल्यावर सगळ्यात पहिला परिणाम होतो, तो त्वचेवर.आहारात व्हिटॅमिन सीचा वापर वाढायला हवा.साखरेमुळे तुमचं वय पटापट वाढतं, म्हणजे वय तुमच्या शरीरावर दिसायला लागतं आणि शरीरावर सुरकुत्याही लवकर पडतात. त्यामुळे साखरेचा वापर अत्यंत मर्यादित ठेवायला हवा.

- मयूर पठाडे

त्वचेचं सौंदर्य राखायचं, टिकवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? रोज त्यासाठी काही ना काही चेहºयाला, त्वचेला लावलंच पाहिजे असं काही नाही. नुसत्या बाह्य उपचारांनी तुमची त्वचा सुंदर, निरोगी राहाणार नाही. त्यासाठी काही करण्याबरोबरच काही गोष्टी तुम्हाला टाळाव्याही लागतील.

सुंदर त्वचेचं रहस्य
१- आपली त्वचा चांगली राहावी यासाठी काही जण सूर्यप्रकाशात, उन्हात जाणं अगदीच टाळतात किंवा जायचं झालं तर त्यासाठी इतका जामानिमा करतात, की आपलं नखही उघडं पडू नये. पण हा अतिरेक झाला. उन टाळलं पाहिजे, हे खरं, पण काही प्रमाणात आपल्या शरीराला उन मिळणं आवश्यकही असतं. त्यामुळे योग्य तेवढा सूर्यप्रकाश आपल्या शरीराला मिळू द्या.
२- बºयाचदा स्वच्छतेचा आपण अतिरेक करतो आणि त्यामुळे अनेक घातक रसायनांशी आपला संपर्क येतो. घरस्वच्छता असो किंवा वैयक्तिक स्वच्छता, त्यासाठीच्या घटकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थ असतात. त्यांच्या संपर्कात आल्यावर सगळ्यात पहिला परिणाम होतो, तो त्वचेवर. अशा विषारी पदार्थांच्या संपकातून आपल्याला वाचवायला हवं.
३- व्हिटॅमिन सीचं आपल्या आहारात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्वचेसाठीही ते अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन सीचा वापर वाढवा.
४- अनेकांना साखर आवडते. त्याचा काहीजण वारेमाप वापर करतात, तर काही साखरेच्या वाºयालाही फिरकत नाहीत. साखर त्वचेसाठी घातक आहे, हे तर खरंच, त्यामुळे साखरेचा वापर कमीत करावा, पण अत्यावश्यक तेवढी साखर शरीराला मिळायलाही हवी, मग ती कुठल्याही मार्गानं घेता येईल. साखरेमुळे तुमचं वय पटापट वाढतं, म्हणजे ते तुमच्या शरीरावर दिसायला लागतं आणि शरीरावर सुरकुत्याही लवकर पडतात. त्यामुळे साखरेचा वापर अत्यंत मर्यादित ठेवायला हवा.
त्वचेची काळजी घ्यायची आणि सुंदर, तरुण दिसायचं तर एवढंच पुरेसं नाही. याविषयीच्या आणखी टिप्स पाहू या पुढच्या भागात..

Web Title: for smooth and beautiful skin ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.