शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

लहान मुले, महिलांच्या पोटाचा घेर आणखी वाढला; भारतात ५ ते १९ वर्षे वयोगटांतील तब्बल १.२५ कोटी मुले स्थूलत्वामुळे त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 07:22 IST

जगभरात स्थूल असलेली बालके, किशोरवयीन व प्रौढ व्यक्ती यांची एकूण संख्या १ अब्ज आहे. १९९० सालापासून आवश्यकतेपेक्षा कमी वजन असलेल्या लोकांची संख्या घटत चालली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतामध्ये ५ ते १९ वर्षे वयोगटातील सुमारे १.२५ कोटी मुले ही स्थूल आहेत. त्यातील ७३ लाख हे मुलगे व ५२ लाख मुली आहेत. ही २०२२ सालातील आकडेवारी आहे. जगातील स्थूल व्यक्तींविषयी विश्लेषण करणारा एक लेख लॅन्सेट या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

जगभरात स्थूल असलेली बालके, किशोरवयीन व प्रौढ व्यक्ती यांची एकूण संख्या १ अब्ज आहे. १९९० सालापासून आवश्यकतेपेक्षा कमी वजन असलेल्या लोकांची संख्या घटत चालली आहे. बहुतांश देशांमध्ये कुपोषणामुळे स्थूलपणाचा आजार होत आहे. गेल्या ३३ वर्षांमध्ये कुपोषणामुळे जागतिक स्तरावर कोणत्या प्रकारचे आजार बळावले याचे चित्र लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातून उभे करण्यात आले आहे. या आजारांचे विश्लेषण शास्त्रज्ञांच्या एनसीडी-रिस्क फॅक्टर कोलॅब्रेशन (एनसीडी-रिस्क) या संस्थेने तसेच जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्तरीत्या केले आहे. आहार आणि पुरेसा व्यायाम केल्यास स्थूलतेवर मात कता येईल, असे आरोग्यत्ज्ञांनी सांगितले.

महिलांनो, सावध व्हा : भारतामध्ये प्रौढ व्यक्तींमध्ये स्थूलत्वाचे प्रमाण १९९० मध्ये १.२ टक्के होते ते २०२२ मध्ये महिलांमध्ये ९.८ टक्के, तर पुरुषांमध्ये ५.४ टक्के इतके वाढले आहे. देशात ४.४ कोटी महिला, २.६ कोटी पुरुष यांना हा आजार झाला आहे. आवश्यकतेपेक्षा कमी वजन असलेल्यांचे प्रमाण जागतिक स्तरावर मुलींमध्ये एक पंचमांश, तसेच मुलांमध्ये एक तृतीयांश इतके घटले.

१ अब्ज जगभरातील स्थूल असलेल्या बालकांची संख्या आहे.१९९०च्या दशकात प्रौढ व्यक्तींमध्ये अधिक आढळणारा स्थूलत्वाचा आजार आता लहान मुलांमध्येही दिसू लागला आहे.१९९०पेक्षा २०२२मध्ये जगात स्थूल व्यक्तींचे प्रमाण चारपट वाढले आहे.

ही चिंतेची बाब आहे. जगातील गरीब देशांमध्ये असंख्य लोक कुपोषणग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांच्यात स्थूलत्वाचा आजार वाढत आहे. जागतिक स्तरावर या आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांचे प्रमाण दुप्पट व पुरुषांपेक्षा तिप्पट झाले आहे. जगभरात १५.९ कोटी बालके, किशोरवयीन मुले व ८७.९ कोटी प्रौढ व्यक्ती स्थूलत्वाच्या आजाराने ग्रस्त आहेत.- माजिद इज्जती, प्राध्यापक, इम्पेरियल कॉलेज

टॅग्स :Healthआरोग्य