शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या चालण्याचा वेग सांगतो, तुम्ही किती लवकर म्हातारे होत आहात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 16:15 IST

Health Tips : वेगाने चालण्याचे फायदे अनेक आहेत, त्यातील एक महत्वाचा म्हणजे वजन कमी करण्यास मदत होते. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, चालण्याच्या वेगावरून हे माहीत पडतं व्यक्ती किती लवकर वृद्ध होणार आहे.

Health Tips :  प्रत्येक व्यक्तीचा चालण्याचा वेग आणि पद्धत वेगवेगळी असते. काही लोक वेगाने चालतात, काही लोक फार हळू रमत-गमत चालतात तर काही लोकांचा चालण्याचा वेग हा मध्यम असतो. वेगाने चालण्याचे फायदे अनेक आहेत, त्यातील एक महत्वाचा म्हणजे वजन कमी करण्यास मदत होते. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, चालण्याच्या वेगावरून हे माहीत पडतं व्यक्ती किती लवकर वृद्ध होणार आहे.

'जामा नेटवर्क ओपन' मध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, ४५ वर्षांचे असे व्यक्ती जे नैसर्गिक रूपाने हळू चालतात, त्यांच्या मेंदूत आणि शरीरात लवकर वृद्ध होण्याची लक्षणे बघायला मिळतात. या लक्षणांना १९ पातळ्यांवर मोजण्यात आले होते. ज्यांच्या माध्यमातून व्यक्ती वृद्ध झाल्यावर त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं असेल याची टेस्ट केली गेली.

रिसर्चमधून समोर आलं आहे की, अशा व्यक्तींना अल्झायमरसारखा विसरण्याचा आजार होण्याचाही धोका जास्त राहतो. सोबतच जे लोक हळू चालतात त्यांच्या लंग्स, दात आणि इम्यून सिस्टीममध्ये वेगाने किंवा मध्यम वेगाने चालणाऱ्यांच्या तुलनेत अधिक समस्या बघायला मिळतात.  इतकेच नाही तर हळू चालणाऱ्यांच्या चेहऱ्यावर वय वाढल्याची किंवा वृद्ध होण्याची लक्षणे दिसू लागतात. आठ लोकांच्या पॅनल द्वारे वेगवेगळ्या लोकांच्या फोटोंवर त्यांची प्रतिक्रिया नोट केल्यावर हा निष्कर्ष काढण्यात आला.

यूएसच्या ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, रिसर्चमधून हैराण करणारे निष्कर्ष समोर आले आहेत. अभ्यासकांनी सांगितले की, लहान मूल जेव्हा तीन वर्षांचं होतं तेव्हा त्यांच्या मेंदूच्या विकासाच्या आधारावर वैज्ञानिक याची माहिती घेऊ शकतात की, ते मध्यम वयात पोहोचल्यावर किती वेगाने चालणार आहेत. सोबतच त्यांचा आयक्यू स्कोर, भाषा समजण्याची क्षमता, मोटर स्किल्स आणि इमोशनल कंट्रोलच्या माध्यमातून याची माहिती मिळवता येऊ शकते. हळू आणि वेगाने चालणाऱ्या लहान मुलांच्या आयक्यूमध्ये १२ अंकांचा फरक बघण्यात आला. 

वैज्ञानिकांचं असं मत आहे की, व्यक्ती कशी चालते हे त्यांच्या अंगांवर आणि ते किती निरोगी आहेत यावर अवलंबून असतं. गोष्टी समजून घेणे आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याची क्षमता सुद्धा चालण्याच्या वेगाशी जोडली जाऊ शकते. हेच कारण आहे की, कमी वेग हे दाखवतो की, व्यक्तीच्या ऑर्गनचं कार्य खराब होत आहे. याने ते वेळेआधीच म्हातारे होण्यासोबतच वेगवेगळ्या आजारांचे शिकार देखील होत आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य