रात्री चांगली झोप घेणे हे केवळ आरोग्यासाठीच चांगलं असतं असं नाही तर याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. कारण झोप आणि वजन यांचा खोलवर संबंध आहे. गेल्या वर्षात सतत झोपेचा आरोग्यावर होणाऱ्या प्रभावावर वेगवेगळे रिसर्च झालेत. झोपेत आपलं शरीर दुसऱ्या दिवसाच्या कामांसाठी लागणाऱ्या ऊर्जेचा एकत्र करत असतं. आणि याने शरीर संतुलित राहतं.
मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल की, झोपल्याने वजन कसं कमी होतं? चला तेच जाणून घेऊ. वजन कमी होण्यासोबतच रात्री पुरेशी झोप घेतल्याने तुमचं आयुष्य वाढू शकतं. जर रात्री पुरेशी झोप घेतली गेली नाही तर तणाव आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या आजारांचाही सामना करावा लागू शकतो. झोप आणि वजन वाढण्याला अंतर्गत रूपाने आपल्या शरीरातील हार्मोन्सशी संबंध आहे. रात्री झोपेत शरीर हार्मोन्स संतुलित करतं. याचा अर्थ हा की, झोपेत शरीरातील कोर्टिसोल हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शरीरात इतरही हार्मोन्स रिलीज होतात.
झोप आणि वजन कमी करण्याचा संबंध दोन हार्मोन्सच्या संतुलनाशी आहे. यातील पहिला हार्मोन म्हणजे ग्रेलिन. हा हार्मोन भूकेचा हार्मोन म्हणून ओळखला जातो. याने तुम्हाला भूक लागल्याची जाणीव होते. रात्री झोपेत असतात शरीर या हार्मोनचं प्रमाण कमी करतं. ज्यामुळे रात्री तुम्हाला भूक लागत नाही. दुसरा हार्मोन म्हणजे लेप्टिन. या हार्मोनने झोप वाढते. शरीरात याचं प्रमाण वाढल्यावर पोट भरलेलं असल्याची जाणीव होते.
या दोन हार्मोन्सला पुरेशा झोपेशी जोडलं गेलं तर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही. अर्थात तुम्ही कमी खाल. या संपूर्ण प्रक्रियेमुळे तुमचा लठ्ठपणा कमी होतो. तेच जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर तुम्हाला दिवसभर भूक लागल्यासारखं जाणवेल आणि भूक वाढतंच राहील. यामुळे तुम्ही जास्त खाल आणि परिणाम म्हणजे वजन वाढेल.
तसेच पुरेशी झोप न घेतल्याने तुमच्या मेटाबॉलिकचा वेग कमी होईल, ज्यामुळे शरीराची कॅलरीला ऊर्जेत बदलण्याची क्षमताही कमी होईल. अशात तुमच्या शरीरात चरबी तयार होणे सुरू होईल. त्यामुळे हे टाळायचं असेल तर वजन वाढण्याला कारणीभूत या गोष्टींकडे लक्ष द्या.