शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सॉक्स घालू झोपता का? चुकूनही करू नका अशी चूक, एक्‍सपर्टने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 14:13 IST

Health Tips : तुम्हीही असं करत असाल तर लगेच असं करणं बंद करा. स्लीपिंग एक्‍सपर्टनुसार, सॉक्समध्ये डोरमॅट इतकेच बॅक्टेरिया असतात.

Health Tips : काही लोकांना रात्री सॉक्स घालून झोपण्याची सवय असते. त्यांना वाटतं की, याने त्याना चांगली झोप येईल. अनेकदा लोक बाहेरून येतात तेव्हा त्याच कपड्यांवर आणि सॉक्स घालून झोपतात. तुम्हीही असं करत असाल तर लगेच असं करणं बंद करा. स्लीपिंग एक्‍सपर्टनुसार, सॉक्समध्ये डोरमॅट इतकेच बॅक्टेरिया असतात.

तुम्हाला वाचून धक्का बसेल की, यात टॉयलेटमध्ये असतात तेवढे किंवा झुरळांच्या विष्ठेत जेवढे बॅक्टेरिया असतात तेवढे असतात. जर तुम्ही सॉक्स घालून झोपत असाल तर तुम्ही रात्रभर बॅक्टेरियाच्या संपर्कात रहाल याने तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं.

एक्‍सपर्ट सांगतात की, तसे तर बेडवर सॉक्स घालून झोपण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की, ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं. झोप लवकर आणि चांगली येते. तुम्ही जास्त वेळ झोपू शकता. मॅट्रेसनेक्स्टडेचे स्लीपच्या प्रोफेशनल्सनुसार, हे महत्वाचं आहे की, तुम्ही बेडवर झोपण्याआधी स्वच्छ सॉक्स घाला. अस्वच्छ सॉक्स घालून झोपल्याने तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं.

मिररच्या एका रिपोर्टनुसार, एक्‍सपर्टने सकाळी 7 वाजेपासून रात्री 11 पर्यंत घातलेल्या सॉक्सची टेस्ट केली. त्याद्वारे यात कोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात हे चेक केलं. तेव्हा समजलं की, काही सॉक्समध्ये स्यूडोमोनास एरुगिनोसा नावाचा एक बॅक्टेरिया होता. जो अनेक प्रकारच्या इन्फेक्शनचं कारण ठरू शकतो. फुप्फुसानाही होऊ शकतं इन्फेक्शन

एक्‍सपर्टने सांगितलं की, हे बॅक्टेरिया तुमच्या श्वसन तंत्राला आपलं शिकार बनवू शकतात. इतकंच काय तर तुमच्या फुप्फुसांनाही इन्फेक्शन होऊ शकतं. तुमच्या घरातील वस्तूंमध्ये पसरू शकतात. कितीही साफ केलं तरी ते साफ होत नाहीत. टेस्टमधून समोर आलं की, सॉक्सवर डोरमॅट इतकेच बॅक्टेरिया होते. टीव्ही रिमोटवरही तेवढेच बॅक्टेरिया आढळून आले जेवढे टॉयलेटमध्ये असतात. सॉक्स घालून झोपणं चांगलंही ठरू शकतं आणि घातकही. पण काळजी घेतली तर धोका टाळू शकता.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य