त्वचा प्रत्यारोपणाने युवकाचा वाचला जीव
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:16+5:302015-08-27T23:45:16+5:30
त्वचा प्रत्यारोपणाने युवकाचा वाचला जीव

त्वचा प्रत्यारोपणाने युवकाचा वाचला जीव
त वचा प्रत्यारोपणाने युवकाचा वाचला जीव-जसपालसिंग अर्नेजा : मध्य भारतात पहिल्यांदाच मोठी शस्त्रक्रिया (फोटो आहे)नागपूर : त्वचेचे यशस्वी प्रत्यारोपण करून मरणाच्या दारात पोहोचलेल्या एका युवकाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. अर्नेजा हार्ट ॲण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झालेली ही मध्य भारतातील पहिली व सर्वात मोठी त्वचारोपण शस्त्रक्रिया आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. जसपालसिंग अर्नेजा यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी यशस्वी प्रत्यारोपण करणारे डॉ. समीर जागीरदार, डॉ. विकास गुप्ता उपस्थित होते. डॉ. गुप्ता यांनी सांगितले, छिंदवाडा येथील रहिवासी २१ वर्षीय मोहित सेवाराम शिर्के एका अपघातात ४० टक्के जळाला. त्याला ११ ऑगस्ट रोजी छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु जखमा गंभीर असल्याने त्याच्या नातेवाईकांनी अर्नेजा हार्ट ॲण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नागपुरात आणले. त्याच्या जखमा पाहून त्वचा प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. - १५०० स्क्वेअर सेंटीमीटर त्वचेचे प्रत्यारोपण डॉ. समीर जागीरदार यांनी सांगितले, २० टक्क्यांपेक्षा जास्त जळालेल्या इसमाला जीवाचा धोका होऊ शकतो. मोहित हा युवक ४० टक्केजळाला होता. त्याला वाचविण्यासाठी १५०० स्क्वेअर सेंटीमीटर त्वचेचे प्रत्यारोपण करण्यात आले. ही त्वचा रोटरी स्किन बँकेने तपासणी शुल्क घेऊन दान केली. रुग्ण नातेवाईकांच्या संमतीने दोन टप्प्यात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. केवळ १४ दिवसांत त्याला रुग्णालयातून सुटीही देण्यात आली.- त्वचादानाची गरज डॉ. अर्नेजा म्हणाले, या पत्रपरिषदेच्या माध्यमातून त्वचादानाची जनजागृती करण्याचा आमचा उद्देश आहे. कारण भारतात पुणे, मुंबई व इंदोरनंतर नागपुरात स्किन बँक आहे. परंतु आतापर्यंत केवळ सहाच जणांनी मृत्युपश्चात आपली त्वचा दान केली आहे. नागपुरात आतापर्यंत दोन रुग्णांवर त्वचा रोपणाची शस्त्रक्रिया पार पाडली. परंतु या शस्त्रक्रिया मोहितच्या शस्त्रक्रियेपेक्षा फार छोट्या होत्या.