शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

झोपण्याआधी चुकूनही करू नका 'या' गोष्टी; अन्यथा कमी वयातच वयस्कर दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 18:21 IST

महागड्या ट्रिंटमेंट्स करुनही त्वचेवर येणारा तजेलदारपणा हा तेवढ्या पूरताच असतो. काही दिवसांनी पुन्हा त्वचा काळपट आणि निस्तेज वाटू  लागते.

दिवसभरात तुम्ही त्वचेची कितीही काळजी घेत असाल तरी रात्री त्वचेला मॉईश्चराईज करणंही तितकंच महत्वाचं असतं. रात्री झोपताना त्वचेची काळजी घेतली तरच तुम्ही दीर्घकाळ तरूण आणि सुंदर दिसू  शकता. कारण रात्रीची झोप तुमच्या त्वचेला ताजतवानं बनवते. प्रदुषण आणि  ताण तणावामुळे त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो.  पार्लरमध्ये पैसै मोजूनही हवा तसा ग्लो मिळत नाही. महागड्या ट्रिंटमेंट्स करुनही त्वचेवर येणारा तजेलदारपणा हा तेवढ्या पूरताच असतो. काही दिवसांनी पुन्हा त्वचा काळपट आणि निस्तेज वाटू  लागते. झोपण्याआधी कोणत्या चुका करणं टाळायला हवं याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

अस्वच्छ उशीचा वापर

रात्री झोपल्यानंतर त्वचेतून बाहेर येणारं तेल आणि डोक्यावरचे केस उशीवरचं पडतात. त्यामुळे उशीच्या कव्हरवर हळू हळू बॅक्टेरिया आणि घाम जमा व्हायला सुरूवात होते.   त्वचेवर पिंपल्स किंवा डाग येऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर उशीचे कव्हर  कमीत कमी आठवड्यातून एकदा बदला. 

ओठांना मॉइश्चराईज करणं

नाईट क्रिम लावणं तुम्ही लक्षात ठेवत असाल तर पण ओठांकडे दुर्लक्ष केलं जाता कामा नये. ओठांची त्वचा खूप पातळ आणि नाजूक असते. ओठ अनेकदा लवकर कोरडे पडतात. ओठांची त्वचा फाटू लागते. रात्री झोपताना रोज ओठांना नारळाचं तेल किंवा तूप लावून झोपा. रोज असं केल्यानं तुमच्या ओठांचा काळपटपणा कमी होऊन ओठ चमकदार आणि मुलायम राहतील.

ओव्हर क्लिन करू नका

चेहरा सतत धुवू नका. सतत साबण लावणं त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे त्वचा कोरडी पडते.  फेसवॉशमधील केमिकलयुक्त घटक त्वचा निस्तेज बनवू शकतात. त्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते. 

पुरेशी झोप घेणं

तुम्ही त्वचेची कितीही काळजी घेत असाल तरी पुरेशी झोप घेतली नाही तर त्वचा रिपेअर होत नाही. कमीतकमी ६ तास झोप  घेतल्यानं त्वचा चांगली राहते.  त्यामुळे सुरकुत्या, डार्क सर्कल्सपासून सुटका मिळते. नॅशनल स्लीप फाउंडेशन नुसार ६ ते ७ तासांची झोप न घेतल्यानं त्वचेवर सूज आणि डार्क सर्कल्स येतात आणि स्ट्रेस हार्मोनही वाढतो

जास्त गरम पाण्यानं अंघोळ करणं

जास्त  गरम पाण्यानं अंघोळ करणं त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. अंघोळ करण्याासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. झोपायला जाण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवायला हवा. तुम्ही दिवसभरात मेकअप करत नसाल तरी रात्री झोपताना चेहरा धुण्याची सवय लावून  घ्या. कारण झोपल्यानंतर त्वचेतील पोर्स ओपन  होतात. त्वचेवरील घाणीमुळे हे पोर्स बंद होतात. त्यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवते .  

हे पण वाचा-

शरीराच्या 'या' भागांवर सगळ्यात आधी दिसतात वयवाढीच्या खुणा; त्वचेची 'अशी' घ्या काळजी

डोक्याला टक्कल पडण्याच्या समस्येनं हैराण आहात? 'या' घरगुती उपयांनी मिळवा लांब केस

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स