शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Heart Attack : कदाचित तुम्हालाही येऊन गेला असेल सायलेंट हार्ट अटॅक, या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 17:56 IST

Silent Heart Attack : सायलेंट हार्ट अटॅकमध्ये फार असामान्य किंवा कोणतंही लक्षण दिसत नाही. अशाप्रकारचा हार्ट अटॅक फारच धोकादायक असू शकतो.

काही खास लक्षणे असतात जी हार्ट अटॅकचा इशारा देतात. जसे की छातीत वेदना-कळ, थंडी वाजण्यासोबत घाम येणे आणि फार जास्त कमजोरी वाटणे. पण तुम्हाला माहीत आहे का की, हार्ट अटॅक विना लक्षणेही येऊ शकतो. कदाचित असंही होऊ शकतं की कधी ना कधी तुम्हालाही हार्ट अटॅक आला असेल आणि तुम्हाला कळालंच नाही. यालाच सायलेंट हार्ट अटॅक (Silent Heart Attack) असं म्हणतात. सायलेंट हार्ट अटॅकमध्ये फार असामान्य किंवा कोणतंही लक्षण दिसत नाही. अशाप्रकारचा हार्ट अटॅक फारच धोकादायक असू शकतो.

काय आहे सायलेंट हार्ट अटॅक?

अमेरिकेतील क्वीवलॅंड क्लीनिकचे कार्डिओलॉजिस्ट कर्टिस रिम्मरमॅन यांच्यानुसार, सायलेंट हार्ट अटॅकचा सर्वात मोठा धोका हा असतो की, काही कळूनच येत नसल्याने लोक यावर उपचारही करू शकत नाहीत. सायलेंट हार्ट अटॅकमध्ये भलेही याची लक्षणे दिसत नसली तरी याने तुमच्या हृदयाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे यावर लक्ष देणं गरजेचं आहे.

सायलेंट हार्ट अटॅकची माहिती कशी मिळते?

ज्या लोकांना हार्ट अटॅक आला हे समजत नाही, त्यांना काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी याबाबत समजतं जेव्हा ते रेग्युलर चेकअपसाठी आपल्या डॉक्टरकडे जातात. हृदयाच्या मांसपेशींचं किती नुकसान झालं. हे बघून डॉक्टर सांगतात की, तुम्हाला कशाप्रकारचा हार्ट अटॅक आला असेल.  यासाठी डॉक्टर इलेक्ट्रोकार्डियोग्राम किंवा कार्डियक अल्ट्रासाउंडच्या माध्यमातून याची माहिती मिळवतात. काही लोक सायलेंट हार्ट अटॅकनंतर लगेच डॉक्टरकडे जातात. कारण त्यांना थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास अशा समस्या होऊ लागतात. सायलेंट हार्ट अटॅक तसा तर कुणालाही येऊ शकतो. पण महिला आणि डायबिटीस रूग्णांना याचा धोका जास्त राहतो.

या लक्षणांवर द्या लक्ष

सायलेंट हार्ट अटॅकमध्ये खास लक्षणे नाहीत दिसत. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही याचे संकेत ओळखू शकत नाहीत. छातीत तणाव, फार जास्त थकवा जाणवणे, एखादं काम केलं तर धाप लागणे, हृदयात जळजळ होणे, अपचन आणि सतत अस्वस्थता जाणवणे हे सायलेंट हार्ट अटॅकचे संकेत असू शकतात. अनेकदा लोकांना वाटतं की, त्यांच्यासोबत काहीतरी बरोबर होत नाहीये. त्यांना यावर विश्वास ठेवायचा नसतो की, हा हार्ट अटॅकही असू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करावा.  

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHeat Strokeउष्माघातHealth Tipsहेल्थ टिप्स