शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

फार जास्त लसूण खाण्याचे होतात 'हे' नुकसान, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 10:56 IST

Side effects eating raw garlic : अनेकांना जास्त लसूण खाण्याचे नुकसान माहीत नसतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Side effects eating raw garlic : लसणाचे आरोग्याला होणारे फायदे सगळ्यांनाच माहीत आहेत. लसणाचा वेगवेगळ्या आजारांवर औषध म्हणून वापर केला जातो. रोज लसणाची एक कच्ची कळी खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. जास्तीत जास्त लोकांना याचे फायदे माहीत असतात. पण अनेकांना जास्त लसूण खाण्याचे नुकसान माहीत नसतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अनेक समस्या होतात

तोंडात फोडं आलेल्यांसाठी लसूण अनेकदा फायद्याचा ठरतो. पण लसणामुळे तोंडाची दुर्गंधी, पोट किंवा छातीत जळजळ होणे, मळमळ वाटणे, उलटी होणे, शरीराची दुर्गंधी येणे अशाही समस्या होऊ शकतात. अशात कच्ची लसणाची पाकळी खाणे अधिक त्रासदायक ठरु शकते. त्यासोबतच ऑपरेशननंतर लसणाचं सेवन करणं अनेक अॅलर्जीचं कारण ठरु शकतो. 

त्वचेचं नुकसान

काही लोक हे चेहऱ्यावर लसणाची पेस्ट लावतात. पण हे काहींसाठी नुकसानकारक ठरु शकतं. काहींसाठी असं हे चांगलं असलं तरी काहींना यामुळे चेहऱ्यावर जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो. 

सर्जरी झालेल्यांसाठी घातक

लसणामुळे रक्ताचा संचार अधिक वेगाने होतो. त्यामुले सर्जरीच्या कमीत कमी दोन आठवड्यांपूर्वी लसणाचं सेवन करु नये. याने सर्जरीमध्ये अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. 

ब्लीडिंग डिसऑर्डर

ताजा लसूण तुमची ब्‍लीडिंगची समस्या वाडवू शकतो. त्यामुळे ब्लीडिंग डिसऑर्डरच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी लसणाचं सेवन योग्य प्रमाणातच करायला हवं. 

हृदयासाठी घातक

अनेक संशोधनानुसार, लसूण खाल्लाने रक्तातील कोलेस्ट्रॉल स्तरात कमतरता आढळली आहे. असेही आढळले आहे की, लसणाच्या अधिक सेवनामुळे हृदय विकाराचा धक्काही आला आहे. 

पोट आणि पचनक्रियेत समस्या

कशातही मिश्रीत न करता तसाच कच्चा खाल्लेल्या लसणामुळे पोटात दुखणे, भूक कमी लागणे, गॅस, उलटी होणे, पोटात-छातीत जळजळ होणे, डायरिया अशाप्रकारच्या समस्या होऊ शकतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य