Health Tips : वेगवेगळ्या फळांचं सेवन करून आरोग्य चांगलं राहतं. फळांचं सेवन केल्याने पोटासंबंधी, त्वचेसंबंधी आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. सोबतच फळांमधील व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. या वेगवेगळ्या फायद्यांमुळे लोक भरपूर फळांचं सेवन करतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, फळांचं जास्त सेवन करणंही नुकसानकारकही ठरू शकतं.
एक्सपर्ट सांगतात की, फळांमध्ये आढळणारं फ्रुक्टोज लठ्ठपणा, दातांमध्ये इन्फेक्शन आणि पचनासंबंधी समस्यांचं कारण बनू शकतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा निरोगी रहायचं असेल तर केवळ फळं खाण्याऐवजी संपूर्ण संतुलित पौष्टिक आहार घ्यायला हवा. कधीही कोणत्याही डाएट ट्रेन्डला विचार न करता फॉलो करू नये.
एक्सपर्ट म्हणाले की, बरेच लोक लवकर वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त फळांचं सेवन करतात. मात्र, असं करण्याचा डॉक्टर किंवा फीटनेस एक्सपर्ट अजिबात सल्ला देत नाहीत. उलट जास्त फळं खाणं आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण फळांमधील फ्रुक्टोजने लठ्ठपणा वाढतो.
त्यासोबतच प्रमाणापेक्षा जास्त फळं खाल्ल्याने सूज, जुलाब आणि पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. फळांमध्ये फायबर आणि नॅचरल शुगर असते. ज्याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. इतकंच नाही तर फळांमध्ये आढळणारं नॅचरल अॅसिड आणि शुगरमुळे दातांच्या समस्याही होतात. तसेच फळांमधील नॅचरल शुगरने ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचाही धोका असतो. डायबिटीसच्या रूग्णांसाठी जास्त फळं खाणं नुकसानकारक ठरू शकतं.