शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शरीरात व्हिटॅमिन सी जास्त झाल्यावर होतात 'या' समस्या, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 15:31 IST

High Vitamin C Side Effects : जर शरीरात एखादं व्हिटॅमिन जास्त झालं तरी नुकसान होतं. अशात शरीरात व्हिटॅमिन सी चं प्रमाण जास्त झाल्यास शरीरावर काय प्रभाव पडतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

High Vitamin C Side Effects : शरीरासाठी वेगवेगळे व्हिटॅमिन्स फार महत्वाचे असतात. एक जरी व्हिटॅमिन शरीरात कमी झालं तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला हेही माहीत असेल की, कोणत्याही गोष्टीची अति ही सुद्धा नुकसानकारक असते. हे व्हिटॅमिन्सबाबतही लागू पडतं. जर शरीरात एखादं व्हिटॅमिन जास्त झालं तरी नुकसान होतं. अशात शरीरात व्हिटॅमिन सी चं प्रमाण जास्त झाल्यास शरीरावर काय प्रभाव पडतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गट हेल्थवर वाईट प्रभाव

गट हेल्थ म्हणजे आतड्यांचं आरोग्य. जर व्हिटॅमिन सी चं जास्त सेवन केलं गेलं तर आतड्यांच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जास्त व्हिटॅमिन सी मुळे पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यात पोटात जळजळ, गॅस, जुलाब आणि उलटी या समस्या होऊ शकतात.

किडनी स्टोनचा धोका

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी मुळे किडनी स्टोन होण्याचा धोका खूप जास्त वाढतो. जर तुम्हाला तुमच्या किडनीचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर व्हिटॅमिन सी चं सेवन जास्त प्रमाणात करू नये. तसेच जास्त व्हिटॅमिन सी मुळे हाय यूरिक अ‍ॅसिडची समस्या देखील होऊ शकते.

मायग्रेनचा धोका

काही रिपोर्ट्सनुसार, शरीरात प्रमाणापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी झाल्यास मायग्रेनची समस्या होऊ शकते. सतत डोकं दुखणं किंवा डोक्यात चक्कर येणं हा व्हिटॅमिन सी जास्त झाल्याचा इशारा आहे. रोज सामान्यपणे ६० ते ९० मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी तुमच्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे योग्य प्रमाणातच व्हिटॅमिन सी असलेल्या फूड्सचं सेवन करावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य