शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बहुगुणकारी आवळा 'या' लोकांसाठी आहे विषासमान! चुकूनही खाल्यास पडेल महागात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 16:02 IST

काही लोकांसाठी आवळा खाणं महागात पडू शकतं.

Amla Side Effects : हिवाळ्यात  हंगामी फळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. बोरे, आवळा यांसारखी हंगामी फळे खरेदी करण्याचा लोकांचा मोठा कल असतो. विशेष बाब म्हणजे या फळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लोक या फळांचा मनमुराद आनंद घेतात.

आवळा आरोग्यासाठी गुणकारी असल्याचे सांगण्यात येते. वेगवेगळ्या पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात. आवळा हा आम्लयुक्त असून त्यात सोडियम, पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने काही लोकांच्या आरोग्यासाठी आवळा खाणे घातक ठरू शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोणते आजार असलेल्या लोकांनी आवळा खाणे टाळायला हवे हे जाणून घेऊयात.

अ‍ॅसिडीटीचा त्रास :

अ‍ॅसिडीटीचा त्रास असल्यास आवळा खाणे टाळले पाहिजे. कारण आवळ्यामध्ये व्हिटामीन सी चे प्रमाण जास्त असल्याने त्याचे रुपांतर आम्लात होते. त्या कारणाने ऍसिडिटीचा त्रास वाढू शकतो आणि त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात.

सर्दी खोकला असल्यास सेवन टाळावे :

आवळा हे मुख्यत: थंड फळ मानले जाते. त्यामुळे सर्दी,खोकला किंवा ताप असलेल्या लोकांनी आवळा खाणे टाळले पाहिजे.

सर्जरी आधी :

एखाद्या रूग्णावर कोणत्याही प्रकारची सर्जरी होणार असेल तर त्याने ऑपरेशनच्या दोन आठवड्याआधी आवळ्याचं सेवन बंद करणे गरजेचे आहे. असे केले नाही तर तुमच्या धमण्या फुटू शकतात आणि ब्लीडिंगचा धोका वाढतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स