शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी जास्त लिंबू पाणी पिणंही ठरू शकतं घातक, जाणून घ्या योग्य प्रमाण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 11:00 IST

Lemon water Side Effects : जास्त लिंबू पाणी प्यायल्याने वजन वेगाने कमी होईल. पण हा मोठा गैरसमज आहे. कारण लिंबू पाणी जास्त प्यायल्यानेही आरोग्याचं मोठं नुकसान होतं.

Lemon water Side Effects : अनेकदा एक्सपर्ट्स वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लिंबू पाण्याचं सेवन करण्याचा सल्ला देत असतात. पण बरेच लोक लिंबू पाण्याचं अधिक सेवन करतात. त्यांचा असा समज असतो की, जास्त लिंबू पाणी प्यायल्याने वजन वेगाने कमी होईल. पण हा मोठा गैरसमज आहे. कारण लिंबू पाणी जास्त प्यायल्यानेही आरोग्याचं मोठं नुकसान होतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) दातांचं नुकसान

जर तुम्हाल लिंबू खाणे पसंत आहे आणि तुम्ही याचं जास्त सेवन करत असाल तर याचा तुमच्या दातांवर वाईट प्रभाव पडू शकतो. लिंबूमध्ये सिट्रस अॅसिड असतं जे दातांना लागल्यावर दातांच्या कोटिंगचं नुकसान होतं. जर लिंबू पाण्याचं सेवन करायचंच असेल तर स्ट्रॉ चा वापर करु शकता. 

२) छातीत जळजळ होणे

ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या आहे त्यांच्यासाठी लिंबूचं जास्त सेवन करणे विषासारखं ठरु शकतं. असे यासाठी कारण त्यात आधीच अॅसिड असतं जे तुमच्या छातीत आणखी जास्त जळजळ निर्माण करु शकतं. 

३) हाडे होऊ शकतात कमजोर

लिंबाच्या जास्त सेवनामुळे तुमची हाडे कमजोर होऊ शकतात. याचं कारण आधी सांगितलं तसं यात सिट्रस अॅसिड अधिक असतं. त्यामुळे लिंबूचं सेवन योग्य प्रमाणातच केलेलं बरं.

४) शरीरात पाणी होतं कमी

जर तुम्ही लिंबू पाण्याचं बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करत असाल तर हे कमी करा. लिंबू पाण्याच्या जास्त सेवन केल्याने शरीरातील आवश्यक पोषत तत्वे शोषून घेतं. यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. 

५) किडनी स्टोनची समस्या

लिंबामध्ये आम्ल असण्यासोबतच याची ऑक्सलेट लेव्हलही जास्त असते. ज्यामुळे हे शरीरात जाऊन क्रिस्टलही तयार करु शकतं. हे क्रिस्टलाइज्ड ऑक्सलेट तुमच्या किडनीमध्ये जाऊन स्टोन तयार करतं. त्यामुळे आता जेव्हाही तुम्ही लिंबाचं सेवन कराल तेव्हा त्यांच्या प्रमाणावर लक्ष द्या. 

एका दिवसात किती लिंबू पाणी प्यावं?

लिंबू पाणी पिऊन शरीराचं नुकसान होऊ नये आणि आरोग्य चांगलं रहावं यासाठी ते योग्य प्रमाणात पिणं गरजेचं असतं. एक्सपर्ट्सनुसार, एका दिवसात दोन लिंबाचा ज्यूस प्यायला जाऊ शकतो. २ लिंबाच्या रसात पाणी मिक्स करून सेवन करा. याने शरीराला अनेक फायदे मिळतील आणि नुकसानही होणार नाही.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य