शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

हिवाळ्यात तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपण्याची सवय पडू शकते महागात, जाणून घ्या नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 10:12 IST

Winter Health Tips : तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. अशात तुम्हाला ब्लॅंकेटमध्ये तोंड झाकून झोपण्याचे साइड इफेक्ट्स माहीत असले पाहिजे. 

Winter Health Tips : हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार रजाई-ब्लॅंकेट अंगावर घेऊन झोपण्याची मजाच वेगळी असते. मात्र, ही मजा तुमच्यासाठी सजाही बनू शकते हे अनेकांना माहीत नसतं. जास्तीत जास्त लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपतात. याने थंडीपासून तर तुमचा बचाव होतो, पण आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा धोकाही वाढतो. तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. अशात तुम्हाला ब्लॅंकेटमध्ये तोंड झाकून झोपण्याचे साइड इफेक्ट्स माहीत असले पाहिजे. 

त्वचेसाठी नुकसानकारक

हिवाळ्यात जेव्हा तुम्ही तोंडावर ब्लॅंकेटमध्ये झोपता तेव्हा ऑक्सीजन ब्लॅंकेटमध्ये योग्य पद्धतीने येत नाही आणि अशुद्ध हवा सुद्धा ब्लॅंकेटमधून बाहेर जात नाही. सोबतच याने त्वचेवर सुरकुत्याही पडू शकतात. त्याशिवाय हिवाळ्यात तोंड झाकून झोपल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशनही सुरळीतपणे होत नाही, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि पुरळ अशा समस्या होतात.

फुप्फुसांसाठी नुकसानकारक

तोंडावर ब्लॅंकेट किंवा दुलई घेऊन झोपल्याचा प्रभाव फुप्फुसांवर सुद्धा पडतो. अशाप्रकारे झोपल्याने फुप्फुसात हवा योग्यपणे अदलाबदल होत नाही. ज्यामुळे फुप्फुसं आकुंचन पावतात. अशात अस्थमा, डिमेंशिया किंवा डोकेदुखीची समस्या वाढू शकते. ज्या लोकांना आधीच अस्थमाची समस्या आहे त्यांनी चुकूनही अशाप्रकारे झोपू नये.

वाढतो हार्ट अटॅकचा धोका

जे लोक ब्लॅंकेटमध्ये तोंड झाकून झोपतात त्यांना हार्ट अटॅकचा धोकाही वाढू शकतो. असं केल्याने शरीराला योग्यपणे ऑक्सीजन मिळत नाही. ज्याचा थेट प्रभाव हार्टवर पडतो. अशा स्थितीत हार्ट अटॅक किंवा श्वास गुदमरण्याचा धोका वाढतो. त्याशिवाय ब्लॅंकेटमध्ये तोंड झाकून झोपल्याने चक्कर किंवा मळमळही जाणवू शकते.

वजन वाढतं

ब्लॅंकेटमध्ये तोंड झाकून झोपल्याने अप्रत्यक्षपणे याचा प्रभाव शरीराच्या वजनावरही पडतो. तोंड झाकून झोपल्याने शरीराला गरमी मिळते, ज्यामुळे कोणतीही व्यक्ती जास्त वेळ झोपते. जेवढा जास्त वेळ तुम्ही झोपाल शरीराचं मेटाबॉलिज्म हळुवार काम करतं, ज्यामुळे शरीराचं वजन वाढतं.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स