शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला पळवण्यासाठी जास्त काढा प्यायलात आता त्याची फळंही भोगा; 'हे' गंभीर आजार वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 16:29 IST

कोरोना टाळण्यासाठी अधिक काढा पिणे देखील हानिकारक असल्याचे सिद्ध होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशातील रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड आणि यकृताच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे.

कोरोना टाळण्यासाठी अधिक काढा पिणे देखील हानिकारक असल्याचे सिद्ध होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशातील रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड आणि यकृताच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये मूत्रपिंडाच्या रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. देशातील सर्वात मोठ्या हॉस्पिटल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्येही लघवीशी संबंधित रुग्ण येऊ लागले आहेत. दिल्ली सरकारचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या एलएनजेपीचीही अशीच स्थिती आहे. अनेक राज्यांच्या प्रमुख रुग्णालयांमध्येही मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्या असलेले रुग्ण येत आहेत.

कोरोनाचा (Coronavirus) कहर आणि भीती लक्षात घेता लोकांनी काढा पिण्याचे प्रमाण प्रचंड वाढवले आहे. अलिकडे जवळजवळ प्रत्येक घरात काढा प्यायला जातो. आयुर्वेदात काढा पिणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. परंतु काढा जास्त प्रमाणात पिणं शरीरासाठी हानिकारक ठरत आहे. हे लक्षात घेऊन डॉक्टरांनी कोरोना टाळण्यासाठी अधिक काढा पिणाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

डॉक्टरांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या अनावश्यक औषधांचा वापर वाढवल्यानं शरीर दुखणे आणि अस्वस्थतेच्या तक्रारी करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. बहुतेक रुग्णांमध्ये सीरम क्रिएटिनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे मूत्रपिंड खराब होण्यासारखी गंभीर बाब दिसून येत आहे.

किडनीच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. राजेश कुमार यांनी न्युज १८ हिंदीला दिलेल्या माहितीत म्हणतात की, काढा  हा गरम असतो आणि तो जास्त प्रमाणात प्यायल्याने तोंड आणि पोटात अल्सर होऊ शकतो. दालचिनी, गिलोय, काळी मिरी सारख्या गोष्टींच्या प्रमाणामुळे पोटदुखी, छातीत जळजळ किंवा अ‍ॅसिडिटी सारख्या समस्या सुरू होतात. जर त्याचे उपचार वेळेवर सुरू झाले नाहीत तर मूत्रपिंड (किडनी) खराब होण्याची शक्यता वाढते. जास्त प्रमाणात काढा घेणे यकृतासाठी देखील हानिकारक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या