शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आजार नसूनही आजारी असल्याच्या भावनेत जगतात ८० टक्के रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 21:51 IST

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात तणावामुळे आजार वाढत आहेत असे म्हटले जाते जाते. मात्र तणावामुळे रक्तदाब किंवा मधुमेह एवढेच नाही तर मनोशारीरिक (सायकोसोमॅटीक) आजारांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज असलेल्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ही खास माहिती.

ठळक मुद्देमनोशारीरिक विकार असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ तणावामुळे आजार असल्याच्या भासात घेतले जात उपचार 

पुणे : प्रसंग एक :  प्रसाद (नाव बदललेले)वय २७, मागील दोन तास डॉक्टरांना मेंदूत बिघाड झाल्याचे पटवत होता. डॉक्टर मात्र एमआरआयचे तपासणीत तसे काहीही निष्पन्न न झाल्याने त्याला गोळ्या देण्यात तयार नव्हते. अखेर प्रसादने दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. 

प्रसंग दोन : वीणाताई (नाव बदललेले) वय ५५ ह्रदयविकाराचा झटका आल्याचा दावा करत एका आठवड्यात तिसऱ्यांदा डॉक्टरांकडे आल्या होत्या. त्यांनाही डॉक्टरांनी तपासणीअंती काहीही झाले नसल्याचे सांगितले. मात्र तरीही त्या मानायला तयार नव्हत्या. 

वरील दोनही केसेसमध्ये शारीरिक आजार नसताना केवळ तणावामुळे शारीरिक आजार आहेतच असा गैरसमज व्यक्ती करून घेते. मनोशारीरिक या नावाने हा  आजार ओळखला जातो. जगभरात तब्बल ८० टक्के लोक या विकाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे तणावाचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषतः मनोशारीरिक विकार असलेल्या रुग्णाला शारीरिक व्याधी नसताना आजारी असल्याची भावना होते, अगदी काहीवेळा वेदनाही होतात. तपासणीअंती काहीही झालं नाहिये असे डॉक्टरांनी पटवले तरी रुग्ण ऐकायला तयार नसतात. 

ही आहेत लक्षणे ?

तणाव हे एकमेव कारण नसले तरी सर्वांचे महत्वाचे कर आहे. कमी वयात वाढत्या अपेक्षांची परिणती तणावात होते आणि त्यातून आजार रुग्णाला जडल्याची भावना निर्माण होते. त्यातही पोटात गाठ आहे, छातीत सतत वेदना होत आहेत, सतत डोके दुखते,हात पाय थरथरणे अशी लक्षणे रुग्णाला जाणवायला लागतात. काही अपवादात्मकवेळा ती खरी असतातही पण अनेकदा त्या भासातून पुढील तपासण्या केल्या तर काहीही निष्पन्न होत नाही. याचा अर्थ रुग्णाला शारीरिक नव्हे तर मानसिक आजार असतो. याच प्रकारचे रुग्ण रोज अपचन होते, अंग दुखते म्हणून गोळीची सवय करतात आणि एका पातळीला त्रास होवो अगर न होवो त्यांना गोळ्या घेतल्याशिवाय चैन पडत नाही. 

प्रतिक्रिया 

हल्ली प्रमाण वाढत आहे मनोशारीरिक आजारांचे. त्यासाठी तणाव हे मुख्य कारण आहे. सर्व वयोगटात असे रुग्ण असून त्यांना आपल्याला काहीही आजार नाही हे स्वीकारणे कठीण जाते. मात्र समुपदेशन आणि तणाव कमी झाल्यावर ते अखेर यातून बाहेर पडतात.  

- डॉ दीपा निलेगावकर, समुपदेशक 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य