मधमाशांच्या हल्ल्यात सातजण जखमी उमवितील घटना : प्राध्यापक, विद्यार्थिनी, सुरक्षारक्षकाचा समावेश
By Admin | Updated: March 15, 2016 00:34 IST2016-03-15T00:34:49+5:302016-03-15T00:34:49+5:30
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात सातजण जखमी झाले असून यामध्ये प्राध्यापक, विद्यार्थिनी, सुरक्षारक्षकाचा समावेश आहे. हल्ल्यानंतर जखमींना जुलाब-उलट्याचा त्रास झाला. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मधमाशांच्या हल्ल्यात सातजण जखमी उमवितील घटना : प्राध्यापक, विद्यार्थिनी, सुरक्षारक्षकाचा समावेश
ज गाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात सातजण जखमी झाले असून यामध्ये प्राध्यापक, विद्यार्थिनी, सुरक्षारक्षकाचा समावेश आहे. हल्ल्यानंतर जखमींना जुलाब-उलट्याचा त्रास झाला. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये १४ मार्च रोजी दुपारी परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी ग्रंथालयाजवळ सावलीमध्ये बसलेले असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. त्या वेळी अनेकजण सैरावैरा पळू लागले. तरीदेखील मधमाशांनी केतकी अनिल जोशी (२०) या विद्यार्थिनीसह तिला घेण्यासाठी आलेला तिचा भाऊ देवानंद अनिल जोशी (२४) दोघे रा. भुसावळ तसेच सहायक प्राध्यापक डॉ. अनिल कुवर, सुरक्षा रक्षक नितीन दिनकर पाटील, भानुदास पाटील, मंगेश भिकन महाजन, विशाल सुभाष इंगळे यांना चावा घेतला. तेथून पळ काढून सर्वांनी कशीतरी सुटका केली. मात्र मधमाशांचे काटे त्यांच्या चेहर्यावर व इतर ठिकाणी होते. त्यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक व इतरांनी धाव घेऊन सर्वांचे शक्य तेवढे काटे काढून प्राथमिक उपचार केले व रुग्णवाहिका बोलावून त्यांना जळगावातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. अनेकांना जुलाब-उलट्या...हल्ल्यानंतर यातील बहुतांश जणांना जुलाब-उलट्यांचा त्रास झाला. यामधील डॉ. अनिल कुवर हे रुग्णालयातच दाखल आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे उपचार करणार्या डॉ. रजनी नारखेडे यांनी सांगितले.