बघा, तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते की नाही ते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 14:36 IST2017-10-02T14:34:10+5:302017-10-02T14:36:30+5:30
प्रत्येक क्षण जगण्याचे दोन पर्याय आपल्याकडे असतात. तुम्ही कोणता निवडणार?

बघा, तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते की नाही ते!
- मयूर पठाडे
प्रत्येक क्षण कसा जगणार, कसा जगायचा याचे दोन पर्याय आपल्याकडे असतात. नेहेमीच. त्यातला कोणता पर्याय निवडायचा हे आपण ठरवायचं असतं.
प्रत्येक क्षण आपण एकतर शांततेनं जगू शकतो किंवा संघर्षपूर्ण.. प्रत्येक क्षण तुम्ही शांततेनं, कोणतीही झटापट न करता जगालात तर तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि जेव्हा जेव्हा तुम्ही त्या क्षणाशी, प्रसंगाशी झटापट करता, संघर्ष करता, त्यावेळी आपल्या शरीरात निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. या दोन्ही एनर्जीचे फायदे अर्थातच आपल्याला माहीत आहेत.
त्यामुळे खात्रीने आपला पहिला पर्याय असेल तो शांततेनं जगण्याचा. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात निर्माण करण्याचा... पण कशी निर्माण करायची ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात?..
त्यासाठीच या काही टिप्स..
आपला रोजचा दिवस शांततेनं कसा सुरू होईल याचा शक्यतो प्रयत्न करा. त्यासाठी ध्यानधारणेचाही उपयोग करता येईल. त्यासाठी प्रत्येक वेळी अगदीच तासन्तास ध्यान आणि योगा करण्याची आवश्यकता नाही, पण मन शांत ठेवण्याची कला, एकाग्र करण्याची कला आपल्याला साधता यायलाच हवी.
स्वत:ला रिलॅक्स ठेवा. तुम्ही म्हणाल, कसं ठेवायचं स्वत:ला रिलॅक्स? बोलणं सोपं आहे, पण करणं कठीण. ते कदाचित कठीण असेल, पण जमणारच नाही, इतकं अशक्य नक्कीच नाही. एकदा सुरुवात केली म्हणजे त्यातला सोपेपणाही आपलाच आपल्याला कळायला लागतो. त्यामुळे आधी सुरुवात तर करा. करा स्वत:च्या शरीराला, मनाला रिलॅक्स.. त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट नक्कीच मिळेल..
स्वत:ला रिलॅक्स करण्याचा सर्वाेत्तम आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे संगीत. आपल्याला आवडतं ते संगीत रोज किमान काही वेळ तरी ऐका. विशेषत: तुमचा दिवस सुरू होण्याच्या काळात. हे संगीत तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी तर निर्माण करीलच, पण अनेक ताणतणावांपासून तुम्हाला दूर ठेवताना त्याच्याशी सहजपणे दोन हात करण्याची ऊर्जाही तुम्हाला देईल.