पल्स पोलिओ लसीकरणाचा दुसरा टप्पा २१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक : सहा लाख ५० हजार व्हॅक्सीन डोसेस सज्ज
By Admin | Updated: February 10, 2016 00:30 IST2016-02-10T00:30:50+5:302016-02-10T00:30:50+5:30
जळगाव- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा या वर्षाचा दुसरा टप्पा २१ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील चार लाख १९ हजार ३४ बालकांना पल्स पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट्य आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल पवार हे होते. यावेळी सर्व विभागप्रमुख, आरोग्य यंत्रणांचे प्रमुख आदी उपस्थित होते. यावेळी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या १७ जानेवारी रोजी पार पडलेल्या टप्प्याबाबत माहिती देण्यात आली. या मोहिमेचा दुसर्या टप्प्यात म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी चार लाख १९ हजार ३४ बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यासाठी ग्रामीण भागात २०७३ तर शहरी भागात ३२५ असे २३९८ लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रांवर ६६८२ इतके कर्मचारी नियुक्त केले

पल्स पोलिओ लसीकरणाचा दुसरा टप्पा २१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक : सहा लाख ५० हजार व्हॅक्सीन डोसेस सज्ज
ज गाव- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा या वर्षाचा दुसरा टप्पा २१ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील चार लाख १९ हजार ३४ बालकांना पल्स पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट्य आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल पवार हे होते. यावेळी सर्व विभागप्रमुख, आरोग्य यंत्रणांचे प्रमुख आदी उपस्थित होते. यावेळी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या १७ जानेवारी रोजी पार पडलेल्या टप्प्याबाबत माहिती देण्यात आली. या मोहिमेचा दुसर्या टप्प्यात म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी चार लाख १९ हजार ३४ बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यासाठी ग्रामीण भागात २०७३ तर शहरी भागात ३२५ असे २३९८ लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रांवर ६६८२ इतके कर्मचारी नियुक्त केले आहे. ३१४ फिरते पथके असून रात्रीसाठी ३ पथके आहेत. ४८६ पर्यवेक्षक या लसीकरण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणार आहेत. आढावा बैठकीत महिला व बालविकास, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महानगरपालिका, वीज वितरण कंपनी, परिवहन विभाग, खाजगी वैद्यकीय रुग्णालये आदी सर्व विभागांना सोपविलेल्या जबाबदारी बाबत आढावा घेण्यात आला. या टप्प्यासाठी सहा लाख ५० हजार व्हॅक्सीन डोसेस सज्ज ठेवण्यात आले आहेत.