शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

​‘सनम रे’ ही तर खºया प्रेमाची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 00:33 IST

सनम रे’ ‘लव्ह ट्रॅँगल’वर आधारित  चित्रपट 

‘सनम रे’ ही तर खºया प्रेमाची गोष्ट!लव्ह स्टोरी हा जवळपास सर्वच प्रकारच्या मनोरंजनात्मक चित्रपटांचा गाभा असतो. पण तरीही प्रत्येक चित्रपटातील लव्ह स्टोरी ही वेगळी असते. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी प्रेम होतेच हे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सांगणारा ‘सनम रे’ हा चित्रपट १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘सनम रे’ हा चित्रपट ‘लव्ह ट्रॅँगल’वर आधारित आहे. या चित्रपटातील अभिनेता पुल्कित सम्राट, अभिनेत्री यामी गौतम आणि रौटेला आदी कलाकारांनी नुकतीच लोकमत कार्यालयाला भेट देऊन चित्रपटाचा प्रवास उलगडला. लव्ह स्टोरी हा सर्व चित्रपटांचा महत्त्वाचा घटक आहे तसाच तो प्रेक्षकांचाही एक आवडीचा विषय आहे. त्यामुळे त्यात दरवेळी नवनवीन काहीतरी देत रहाणे हा दिग्दर्शक, लेखकांचा प्रयत्न असतो. जसं की काहींना कॉलेजमध्ये कोणीतरी आवडतं. त्याच प्रेमात रूपांतर होतं. तर कोणाला शाळेत असल्यापासून एखादा मुलगा किंवा मुलगी आवडत असते आणि त्या दोघांशिवाय तसच प्रेम करणारी अजून एक व्यक्ती असते. आणि मगं प्रश्न निर्माण होतो तो कोणाला कायमच आपलं करायच आणि कोणाला दुखावायचं? मगं त्यावेळी घडणाºया गमती-जमती, प्रेम व्यक्त करण्याची पद्धत, रूसवे, हेवे दावे, भांडण हे सारे निराळेच असते. अशाच एक लव्ह स्टोरीमधील वेगळेपणा दाखवणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाला दिव्या खोसला कुमार यांनी दिग्दर्शित केले आहे. या चित्रपटाची कथा शाळेपासून सुरू होते.=================================================प्रेम आजही तसेच आहेही एक लव्ह स्टोरी आहे. यामध्ये मी श्रुतीची भूमिका साकारत आहे. बºयाच कालावधीनंतर प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी पहायला मिळेल. आज काल रोम-कॉममध्येही रोमान्सपेक्षा कॉमेडी चित्रपट बरेच येत आहेत. पण या चित्रपटातून दिग्दर्शकांनी वेगळं काहीतरी सांगायचा प्रयत्न केला आहे. प्रेम जसं पूर्वी होत तसचं आजही आहे. त्याचे नियम क दाचित बदलले असतील पण त्याचा हेतू आणि त्यातील पारदर्शकता आजही तशीच आहे. यामी गौतम, अभिनेत्री=================================================ँआधी कथा आली नंतर पटकथाही खूपच वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी आहे. कारण यामध्ये पहिल्यांदा कथा लिहिली गेली आणि त्यानंतर त्यातून पटकथा तयार झाली. त्यामुळे ही नेहमीच्या लव्ह स्टोरीसारखीच असली तरी त्यातही एक वेगळेपण आहेच. त्याबरोबरच चित्रीकरणादरम्यान खूप काही शिकायला मिळालं. यातील गाणी तर सगळ्यांना आवडतच आहेत, तितकाच हा चित्रपटही आवडेल. पुलकित सम्राट, अभिनेता=================================================माझी पहिलीच पॅशनेट लव्ह स्टोरीयामध्ये मी आकांक्षा हे पात्र साकारत आहे. ती एक समाजसेविका आहे. पण त्याबरोबरच प्रोफेशनल बिझनेस वूमनही आहे. असं असूनही ती खूप प्रेमळ स्वभाव असणारी मुलगी आहे. ती ज्या मुलावर प्रेम करते त्या मुलाच्या आनंदातच स्वत:चा आनंद शोधत असते. ही मी साकारत असलेली पहिलीच पॅशनेट लव्ह स्टोरी आहे. ज्यांचा प्रेमावर विश्वास आहे, नात्यांवर विश्वास आहे त्यांच्यासाठीचा हा चित्रपट आहे. उर्वशी रौटेला, अभिनेत्री=================================================