हॅलो ग्रामीणसाठी २७२४ शाळांमध्ये घेतले पोषण आहाराचे नमुने पाच शाळेतील नमुने औरंगाबाद येथील शाळेत प्रयोगशाळेत पाठविणार
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:49+5:302015-08-08T00:23:49+5:30
जळगाव : प्राथमिक शिक्षण संचलनालयातर्फे देण्यात आलेल्या निर्देशानुसार शुक्रवारी जिल्हाभरातील २ हजार ७२४ शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळास्तरावर पुरवठा करण्यात आलेल्या तांदूळ, डाळी, कडधान्य, तेल, कांदा, लसूण मसाला, हळद पावडर, मीठ या वस्तूंचे नमुने घेण्यात आले आहेत.

हॅलो ग्रामीणसाठी २७२४ शाळांमध्ये घेतले पोषण आहाराचे नमुने पाच शाळेतील नमुने औरंगाबाद येथील शाळेत प्रयोगशाळेत पाठविणार
ज गाव : प्राथमिक शिक्षण संचलनालयातर्फे देण्यात आलेल्या निर्देशानुसार शुक्रवारी जिल्हाभरातील २ हजार ७२४ शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळास्तरावर पुरवठा करण्यात आलेल्या तांदूळ, डाळी, कडधान्य, तेल, कांदा, लसूण मसाला, हळद पावडर, मीठ या वस्तूंचे नमुने घेण्यात आले आहेत. केंद्र प्रमुखांनी प्रत्येक शाळांमध्ये जाऊन या तपासणी केल्या आहेत. त्यानुसार सर्व शाळांपैकी कोणत्याही पाच शाळांचे नमुने हे औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी दिली आहे. दरम्यान, १५ तालुक्यातील सर्व शाळांमध्ये ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. जिल्ात स्थानिक स्वराज संस्थेच्या १९४५ शाळा आहेत. ७७६ खाजगी अनुदानित तर १६ बालकामगारांच्या शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये शालेय पोषण आहार दिला जातो.