शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

Coronavirus Vaccine : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही कोणती लस प्रभावी?; जाणून घ्या माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 10:14 AM

सध्या भारतात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. भारतात तीन लसींच्या वापरास मिळाली आहे मंजुरी

ठळक मुद्देसध्या भारतात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.भारतात तीन लसींच्या वापरास मिळाली आहे मंजुरी

देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण हा त्यावरील एक पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. आता १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. सध्या देशात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसी उपलब्ध आहेत. परंतु आता सरकारनं रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीच्या आपात्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे. या लसीची पहिली खेप नुकतीच भारतात दाखल झाली. दरम्यान, आपण पाहूया की कोणती लस एकमेकांपासून किती वेगळी आण किती प्रभावी आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेत या तिन्ही लसींचा समावेश करण्यात येणार आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा समावेश यापूर्वीपासूनच करण्यात येत आहे. परंतु आता स्पुटनिक व्ही या लसीचाही वापर होणार आहे. सध्या जी लस उपलब्ध आहे ती टोचून घेण्याचं आवाहन वैज्ञनिकांकडून करण्यात येत आहे. तिन्ही पैकी कोणती उत्तम?सध्या उपलब्ध असलेल्या लसींपैकी तिन्ही लसी या उत्तम आहेत. कोव्हॅक्सिन ही लस पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आली आहे आणि त्याचं उत्पादनही भारतात करण्यात येत आहे. तर दुसरीकडे कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनका यांनी एकत्रित विकसित केली आहे. भारतात त्याचं उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून करण्यात येत आहे. तर १ मे रोजी भारतात दाखल झालेल्या स्पुटनिक व्ही ही लस मॉस्कोच्या गामालेया इंस्टिट्यूटने रशियन डेवलपमेंट अँड इन्वेस्टमेंट फंडसोबत (RDIF) विकसित केली आहे. भारतात डॉ. रेड्डीज लॅबच्या देखरेखीखाली सहा कंपन्या या लसीचं उत्पादन करणार आहे.  

कशा बनल्यात या लसी?कोव्हॅक्सिन ही लस इनअॅक्टिव्हेटेड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. यात डेड व्हायरस शरीरात सोडला जातो. ज्यामुळे अँटीबॉडी रिस्पॉन्स होतो आणि शरीर विषाणूला ओळखण्यासाठी आणि त्याच्याशी लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार करतो.कोविशिल्ड वायरस वेक्टर व्हॅक्सिन आहे. यात चिम्पान्झीमध्ये आढळणाऱ्या एडेनोवायरस ChAD0x1 चा वापर करून कोरोना विषाणूसारखा स्पाईक प्रोटीन तयार करण्यात आला आहे. तो शरीरात गेल्यानंतर त्या विरोधात अँटिबॉडी विकसित करतो.तर दुसरीकडे स्पुटनिक व्ही एक व्हायरल वेक्टर व्हॅक्सिन आहे. यात फरक हा आहे की ही लस एका ऐवजी दोन व्हायरसनं तयार केली आहे. यामध्ये दोन्ही डोस हे निरनिराळे असतात. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनमध्ये मात्र असं नाही. 

कोणती लस किती प्रभावी?जेव्हा प्रभावीपणाचा विचार केला जातो तेव्हा सर्व तीन लस फार प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. तिन्ही लसी WHO ची मानके पूर्ण करतात. अद्यापही यांचे क्लिनिकल चाचण्यांमधून डेटा येत आहेत आणि या लस किती प्रभावी आहे याबाबत अभ्यास सुरू आहे. कोविशिल्ड या लसीची एफिकसी ७० टक्के इतकी आहे. दोन डोसमधील अंतर वाढवल्यानंतर ती अधिक वाढते. ही लस केवळ गंभीर लक्षणांपासून वाचवत नाही तर बरे होण्याची वेळही कमी करते. म्हणजेच रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्यात तो लवकर बरा होतो.कोव्हॅक्सिन या लसीची एफिकसी ७८ टक्के आहे. गंभीर लक्षण रोखण्यासाठी आणि मृत्यू टाळण्यासाठी ही लस १०० टक्के प्रभावी असल्याचं म्हटलं जात आहे. स्पुटनिक व्ही ही लसदेखील सर्वात प्रभावी आहे. याची एफिकसी ९१.६ टक्के इतकी आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाrussiaरशियाIndiaभारत