शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरील अफवांनी मासिक पाळीच्या आरोग्याला धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 08:54 IST

महिलानी यादरम्यान केस धुणे, टॅम्पॉन्स टाळावे का?

नवी दिल्ली : बहुतेक भारतीय महिला मासिक पाळीबद्दल माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडियाला चांगला स्त्रोत मानतात, मात्र सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीचा मासिक पाळीच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. ‘एव्हरटीन मासिक स्वच्छता सर्वेक्षण’मधून ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात सहभागी ७२.४ टक्के महिला १९-३५ वयोगटातील होत्या. यातील ७६.६ टक्के महिलांनी पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण पूर्ण केले होते.

सोशल मीडियावर खोटी माहिती? 

उशिरा मासिक पाळी येणे म्हणजे पोलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज (पीसीओडी) आहे.

मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यासाठी लिंबूपाणी किंवा कॉफी पिण्याचा सल्ला देण्यात आला होता.

मासिक पाळीत व्यायाम केल्यास शरीराला इजा होईल.

मासिक पाळीचे रक्त अपवित्र असते, या दरम्यान महिलांनी धार्मिक स्थळांना भेट देऊ नये, लोणचे किंवा आंबवलेले पदार्थ यांना स्पर्श करू नये.

मासिक पाळी दरम्यान केस धुणे टाळावे, दूध आणि दही सारखे पांढऱ्या रंगाचे पदार्थ टाळणे, मासिक पाळीच्या वेळी महिला गर्भवती होऊ शकत नाहीत.

टॅम्पॉन्स वापरल्यामुळे जननेंद्रीय मोठे होते तर मासिक कप वापरण्याबाबत भीती निर्माण करणारी माहितीही पसरविली जात होती.

इन्फ्लूएन्सर्सवर विश्वास

भारतातील दोन-तृतीयांश पेक्षा जास्त महिला माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. यामुळे इन्फ्लूएन्सर्स आणि ब्लॉगर्स मासिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात उत्तम कार्य करत असल्याचे दिसते.

८७.८% महिला मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅड वापरत आहेत.

८२.७% महिलांना पाळीदरम्यान सौम्य ते तीव्र वेदना झाल्या.

७१.६% महिलांना वाटते की, मासिक पाळीबाबत सोशल मीडियावर पुरेशी माहिती मिळते.

४१.५% महिलांनी पाळीदरम्यान कोणत्याही प्रकारचे वेदना कमी करणारे औषध वापरले नाही.

१४.२% महिलांनी वेदनाशामक गोळ्यांचा वापर केला.

टॅग्स :womens healthस्त्रियांचे आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स