शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे काकडी खाणं टाळता? जाणून घ्या योग्य पद्धत, मिळतील अनेक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 10:29 IST

काकडीने शरीरात डिहायड्रेशन होत नाही. हिवाळ्यात तहान कमी लागते आणि यामुळे शरीरात डिहायड्रेट होऊ शकते.

काकडी भरपूर लोक रोज आवडीने खातात. पोट थंड ठेवण्यासाठी, शरीरात पाण्याची लेव्हल कायम ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी काकडीचं सेवन केलं जातं. मात्र, भरपूर लोक हिवाळ्यात काकडी खाणं सोडतात. कारण काकडी थंड असते. अशात त्यांना सर्दी होण्याची भिती असते. पण हा समज चुकीचा आहे.हिवाळ्यात शरीराची पचनक्रिया कमजोर होत असते. यामुळे काकडी खाल्ल्याने पचनास समस्या होऊ शकते. तसेच गॅस, अपचनाची समस्याही होऊ शकते. मात्र, या समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो. यासाठी काकडी खाण्याची एक वेगळी पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. 

हिवाळ्यात काकडी खाण्याचे फायदे

काकडीने शरीरात डिहायड्रेशन होत नाही. हिवाळ्यात तहान कमी लागते आणि यामुळे शरीरात डिहायड्रेट होऊ शकते. तोंड कोरडं पडणे, त्वचा ड्राय होणे, ओठ उलणे याची मुख्य लक्षणं आहेत. एक्सपर्ट सांगतात की, काकडीमध्ये ९० टक्के पाणी असतं. अशात काकडीने डिहायड्रेशन कमी करण्यास मदत मिळते.

बद्धकोष्ठता होईल दूर

पाणी कमी झाल्याने बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. काकडीमध्ये पाण्यासोबतच फायबरही भरपूर प्रमाणात असतं. या दोन्ही गोष्टींमुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून बचाव होतो.

वजन कमी होईल

हिवाळ्यात भूक वाढते. त्यामुळे खाणं-पिणंही जास्त होतं. अशात वजन कमी करणं अवघड होतं. मात्र, काकडीच्या सलादचा डाएटमध्ये समावेश केल्यास कॅलरी इनटेक कमी केलं जाऊ शकतं. तसेच फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि भूक कमी लागते.

ब्लड शुगर कंट्रोल

एक्सपर्ट अनेक रिसर्चचा हवाला देऊन सांगतात की, काकडीच्या सेवनाने डायबिटीसचा धोका कमी केला जाऊ शकतो. याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. यासाठी काकडी सालीसोबत खाणं अधिक फायदेशीर ठरतं.

काकडी खाण्याची योग्य पद्धत

काकडी थंड असते आणि पचन होण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे काकडी रात्री खाणं टाळलं पाहिजे. जेव्हाही काकडी किंवा काकडीचा सलाद खाल तेव्हा एक बदल करा. काकडीवर काळी मिरी पावडर, जिरेपूड, काळं मीठ असे मसाले टाका. यामुळे काकडी लवकर पचेल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य