शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

ऋजुता दिवेकर यांनी सांगितली केसांची मालिश करण्याची योग्य पद्धत, सगळ्याच समस्या होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:55 IST

Right way to do Hair massage : तुम्हाला आठवत असेल की, जुन्या काळात कोणतेही उत्पादने न वापरता केस लांब, मुलायम आणि चमकदार राहत होते. त्याचं कारण होतं केसांची मालिश करण्याची योग्य पद्धत जी आज अनेकांना माहीत नसते.

Right way to do Hair massage : सगळ्यांनाच वाटत असतं की, त्यांचे केस लांब, चमकदार आणि मुलायम असावेत. तसेच त्यांना केसगळतीची समस्या होऊ नये. पण वेगवेगळ्या कारणांमुळे आजकाल कमी वयातच केस गळायला सुरूवात होते. इतकंच नाही तर केसांचा चमकदारपणा जातो आणि केस रखरखीत होतात. अशात महिला आणि पुरूष केस चांगले करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्स असलेल्या उत्पादनांचा वापर करतात. पण तुम्हाला आठवत असेल की, जुन्या काळात कोणतेही उत्पादने न वापरता केस लांब, मुलायम आणि चमकदार राहत होते. त्याचं कारण होतं केसांची मालिश करण्याची योग्य पद्धत जी आज अनेकांना माहीत नसते.

आजकाल जास्तीत जास्त लोकांना केसगळीतीची समस्या भेडसावते. त्यात महिला आणि पुरूष दोघांचाही समावेश आहे. हेच काय तर कमी वयातही केस पांढरे होतात आणि केसगळती होऊ लागते. त्यामुळे लगेच टक्कल पडतं. केसासंबंधी या समस्या दूर कशा करता येतील याचा सल्ला डायटिशिअन ऋजुता दिवेकर यांनी दिला आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत केसांची तेलाने मालिश करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. 

त्यांची केसांना तेलाने मालिश करण्याची ही पद्धत तुम्ही फॉलो केली तर केसगळती, पांढरे केस अशा समस्या लगेच दूर होण्यास मदत मिळेल. केसांना तेलाने मालिश करण्याची ही योग्य पद्धत अनेकांना माहीत नसते. तिच आज जाणून घेऊ.

हाताने मसाज

ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं की, आधी हातांवर थोडं तेल घ्या आणि ते डोक्याच्या मधोमध टाका. त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा. याने तेल केसांच्या मुळापर्यंत जाईल आणि केसांना पोषण मिळेल. तसेच तुम्हाला याने आरामही मिळेल. 

टॅप करा

हातांवर थोडं तेल घेऊन ते डोक्याच्या मधोमध टाकल्यावर हाताने काही सेकंद टॅप करा. याने तेल सगळीकडे पसरेल आणि तुमचं डोकं दुखणंही थांबेल. 

बोटांनी करा मसाज

डोक्याच्या मधोमध तेल टाकल्यावर बोटांच्या मदतीने डोक्यावर सगळेकडे हलक्या हाताने मसाज करा. याने केस डोक्याच्या त्वचेत आतपर्यंत जाईल आणि केसांना पोषण मिळेल.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स