शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फळं आरोग्यासाठी उत्तम म्हणून कधीही खाऊ नका.. पडेल चांगलेच महागात, जाणून घ्या योग्य वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 14:18 IST

फळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात, ज्याचे सेवन दिवसभर करता येते. परंतु, कोणताही आजार किंवा उपचार सुरू असताना योग्य वेळेनुसार फळांचे सेवन करावे.

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी फळांचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही फळे खायला आवडतात. फळांमध्ये विविध प्रकारचे पोषक आणि अँटिऑक्सिडंट घटक असतात जे अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. आजारी असताना फक्त फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, ऐरव्हीदेखील फळे किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी खावीत, याची अचूक माहिती असणेही महत्त्वाचे आहे.

अनेकजण संध्याकाळी फळे न खाण्याचा सल्ला देतात, तर कोणी जेवणानंतर फळे खाऊ नयेत, असे म्हणतात. त्याचबरोबर अशी काही फळे आहेत जी, रिकाम्या पोटी खाल्ल्यास नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया फळे खाण्याची योग्य वेळ कोणती आणि कोणती फळे रिकाम्या पोटी खाणे हानिकारक ठरू शकते.

शरीर सशक्त आणि निरोगी राहण्यासाठी फळांचे सेवन आवश्यक आहे. हेल्थलाईनच्या माहितीनुसार दिवसा कधीही फळे खाऊ शकता. फळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात, ज्याचे सेवन दिवसभर करता येते. परंतु, कोणताही आजार किंवा उपचार सुरू असताना योग्य वेळेनुसार फळांचे सेवन करावे.

वजन कमी -फळांमध्ये भरपूर फायबर असते, फळे खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरलेले राहते. त्यामुळे वजन कमी राखण्यासाठी दुपारी 11 ते 12 या वेळेत फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. 12 वाजता फळे खाल्ल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल, त्यामुळे दुपारच्या जेवणात कमी कॅलरीज खाल्ल्या जाऊ शकतात. याशिवाय फळे गोड असतात, त्यामुळे त्यात कॅलरीज जास्त असतात. जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढू शकतात, त्यामुळे जेवणानंतर फळे न खाण्याचा सल्ला दिला जातो.

गर्भधारणेमध्ये फळे खाणे -गर्भधारणेदरम्यान फळे खाणे खूप महत्त्वाचे आहे. गरोदरपणात फळे कधीही खाऊ शकता, पण जेवण्यापूर्वी फळे खाल्ल्याने गॅसची समस्या होऊ शकते. त्यामुळे गरोदरपणात न्याहारीनंतर फळांचे सेवन करणे चांगले. गरोदरपणात मधुमेहाचा धोकाही जास्त असतो, त्यामुळे कॅलरीज नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.

ही फळे रिकाम्या पोटी खाऊ नका -

  • केळी
  • नाशपाती
  • संत्रा
  • मौसंबी
  • आंबा
  • द्राक्षे
  • लिची
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स