शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात नारळ पाणी कोणत्या वेळी पिणं जास्त फायदेशीर ठरतं? जाणून घ्या योग्य वेळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 11:01 IST

Coconut Water In Winter : नारळ पाण्यामध्ये अनेक पोषक तत्वेही असतात ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. मात्र, अनेकांना प्रश्न पडत असतो की, हिवाळ्यात नारळाच पाणी प्यावं की नाही? चला जाणून घेऊ...

Coconut Water In Winter : नारळ पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. नारळ पाण्याचे शरीर हायड्रेट राहतं आणि भरपूर एनर्जी मिळते. नारळ पाण्यामध्ये अनेक पोषक तत्वेही असतात ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. मात्र, अनेकांना प्रश्न पडत असतो की, हिवाळ्यात नारळाच पाणी प्यावं की नाही? चला जाणून घेऊ...

नारळ पाण्यातील पोषक तत्व

नारळ पाण्यामध्ये प्रोटीन, गुड फॅट, कार्बोहायड्रेट्स, फायबर, आयर्न, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फॅटी अ‍ॅसिडचं प्रमाण भरपूर असतं. याच्या सेवनाने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.

हिवाळ्यात नारळ पाणी पिणं योग्य की अयोग्य?

सर्दी-खोकला

थंडीच्या दिवसात सकाळी आणि सायंकाळी नारळाचं पाणी प्याल तर सर्दी आणि खोकल्याची समस्या होण्याचा धोका असतो. एक्सपर्ट्स सांगतात की, नारळाचं पाणी थंड असतं, त्यामुळे थंडीच्या दिवसात हे दुपारी प्यावं.

ब्लड प्रेशर

थंडीच्या दिवसात ब्लड प्रेशर जास्त प्रभावित होतं. यादरम्यान नारळाचं पाणी पिऊ नये. नारळाच्या पाण्यात ब्लड प्रेशर डाउन करण्याचे गुण असतात. पण जास्त पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर हाय सुद्धा होऊ शकतं.

लूज मोशन

कोणत्याही गोष्टीची अति केली तर शरीरासाठी नुकसानकारक असते. त्यानुसार जर नारळाचं पाणी जास्त प्याल तर लूज मोशनची समस्या होऊ शकते. शरीरात पाण्याचं प्रमाण वाढलं की असं होतं.

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ

नारळ पाणी रिकाम्या पोटी किंवा दुपारी पिणं अधिक चांगलं मानलं जातं. नारळाचं पाणी प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्याशिवाय डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. सकाळी नारळ पाणी प्याल तर हार्टबर्न, अ‍ॅसिडिटी आणि मॉर्निंग सिकनेस दूर होतं. मात्र, हिवाळ्यात नारळ पाणी दुपारी प्यावे. नारळ पाण्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होतात ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य