गवईंचा उपचाराला प्रतिसाद
By Admin | Updated: June 29, 2015 00:38 IST2015-06-29T00:38:33+5:302015-06-29T00:38:33+5:30
गवईंचा उपचाराला प्रतिसाद

गवईंचा उपचाराला प्रतिसाद
ग ईंचा उपचाराला प्रतिसादनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष व बिहार, केरळचे माजी राज्यपाल रा.सू. गवई यांच्यावर धंतोली येथील एका खासगी इस्पितळात आठवड्यापासून उपचार सुरू आहेत. उच्च रक्तदाबामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने ते कोमात आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांच्या डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे रविवारी त्यांनी काहीसा उपचाराला प्रतिसाद दिला, अशी माहिती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. संजीव बैस यांनी दिली. ते म्हणाले, त्यांची हृदयगती व रक्तदाबही सुरळीत आहे. मात्र, एकूणच स्थिती पाहता ते धोक्याबाहेर आहेत, असे म्हणता येणार नाही.