शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

वातावरणातील तप्तता कमी होऊन गुलाबी थंडीला सुरुवात, हिवाळ्यातील आरोग्य सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:59 AM

वातावरणातील तप्तता कमी होऊन गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. घामाच्या धारांनी बेजार झालेल्यांसाठी थंडीची ही चाहूल नक्कीच सुखद आहे.

- रीना चव्हाणवातावरणातील तप्तता कमी होऊन गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. घामाच्या धारांनी बेजार झालेल्यांसाठी थंडीची ही चाहूल नक्कीच सुखद आहे. आरोग्याचा विचार करता ऋतू कोणताही असला तरी शरीराला पाण्याची नेहमीच गरज असते. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळा आणि पावसाळ्यात बाहेरील वातावरण थंड असल्याने तहान कमी लागते. त्यामुळे आपण पाणी कमी पितो; पण त्यामुळे आपल्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण होत नाही. शरीरातील विषारी घटकांना बाहेर टाकण्यासाठी दररोज गरजेएवढे पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळेच हिवाळ्यातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी पाण्याऐवजी तुम्ही आहारात पाण्याचे प्रमाण जास्त असणाºया पदार्थांचे सेवन करू शकता. जेणेकरून शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्याबरोबर शारीरिक स्वास्थ टिकून राहील.दहीसर्दी, खोकला, ताप आदी आजार या हंगामात डोके वर काढतात. त्यामुळे हिवाळा आहे दही खाऊ नका. उन्हाळ्यात दही खाणे चांगले, असे बरेच जण सांगतात; पण हिवाळ्यात सकाळच्या नाष्ट्यात दही किंवा लस्सी घेतल्याने तुमच्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण होऊ शकते, कारण त्यात ८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. तसेच यातील कॅल्शिअममुळे हाडेसुद्धा मजबूत होतात.पालकपालकमध्ये प्रोटीन, विटॅमीन, आयर्नबरोबर पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे हिवाळ्यात आहारात याचा नक्की समावेश असावा. पालक भाजी किंवा सूप घेतल्याने शरीरातील पाण्याची कमरता दूर होईल.तांदूळतांदूळ वा भात आहारातील मुख्य घटक आहे. कारण त्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही, मग कोणताही ऋतू असो. शिजवलेल्या तांदळात ७० टक्के पाण्याचे प्रमाण असते. जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर यामध्ये आयर्न, कार्बोहायड्रेट सारखे महत्त्वपूर्ण घटक असतात.ब्रोकोलीपोषक घटनांबरोबरच ब्रोकोलीमध्ये ८९ टक्के पाण्याचे प्रमाण असते. ब्रोकोली नुसती उकडून खाल्ली, तरी आरोग्यदृष्ट्या अधिक फायदेशीर असते.फळसफरचंदामुळे ८९ टक्के पाणी असून फायबर, विटॅमीन सी, कॅल्शिअम बरोबर अन्य पोषक घटकांचा यात समावेश असतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. संत्र आणि मोसंबी यांच्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असल्या, तरी पोषक तत्त्वांबरोबर त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर अननस, दाक्षे, ब्ल्यू बेरी, स्टॉबेरी, कलिंगड यांच्या सेवनानेही हिवाळ्यातील पाण्याची कमतरता पूर्ण होईल.लिंबूलिंबामध्ये विटॅमीनचे प्रमाण भरपूर असल्याने ते शरीरातील विषारी घटकांना बाहेर फेकण्यास मदत करते. त्यामुळेच आहारात सलाड, फळांबरोबर लिंबाचा समावेश गरजेचा.सलाडगाजर, काकडी, मुळा, टोमॅटो यांच्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हिवाळ्यात आहारात यांचा नेहमी समावेश असावा.

टॅग्स :Healthआरोग्य