शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डायबिटीसवर फायदेशीर आहे 'हे' महागडे लाकूड, त्वचारोगांवरही आहे रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 16:36 IST

जाणून घेऊया या लाल चंदनाच्या लाकडाचा मधुमेहासोबत इतर कोणत्या समस्यांवर कसा फायदा होतो याविषयी.

मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. वय वाढल्यानंतर अनेकांमध्ये मधुमेहाचा त्रास सुरू होतो. आजकाल तर कमी वयात देखील अनेकांना मधुमेहाचा त्रास सुरू होतो. मधुमेह हा एक असा आजार आहे जो एकदा झाला तर आयुष्यभर साथ सोडत नाही. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे (Blood Sugar Level) खूप गरजेचे असते.

मधुमेहाच्या रुग्णांना त्यांचे आरोग्याची काळजी घेणे सोपे नसते. कारण त्यांना रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका नेहमीच असतो. अशावेळी तुम्ही 'लालचंदना'च्या (Red Sandalwood) लाकडाचा वापर करू शकता. याला 'रक्तचंदन' किंवा वैज्ञानिक भाषेत 'टेरोकार्पस सँटालिनस' (Pterocarpus Santalinus) म्हटले जाते. जाणून घेऊया या लाल चंदनाच्या लाकडाचा मधुमेहासोबत इतर कोणत्या समस्यांवर कसा फायदा होतो याविषयी.

मधुमेहावर प्रभावी ठरते लाल चंदन'झी न्यूज हिंदी'च्या बातमीनुसार लाल चंदनामध्ये असलेले सक्रिय घटक (Active Ingredient) शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांनी या लाकडापासून बनवलेल्या ग्लासात किंवा इतर भांड्यात रात्रभर पाणी ठेवावे आणि सकाळी ते प्यावे. या गुणांमुळेच अनेक घरांमध्ये लाल चंदनापासून बनवलेल्या ग्लासचा पारंपारिकपणे वापर केला जातो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे पाणी खूप उपययुक्त ठरू शकते. मधुमेहासोबत लाल चंदनाचे लाकूड इतर काही समस्यांवर देखील उपयुक्त ठरू शकते.

या त्वचेच्या समस्याही होतील दूर

स्किन पिग्मेंटेशन बरे होते चेहऱ्यावर पिग्मेंटेशन असेल तर तुमच्या सौंदर्यात अडचण येऊ शकते. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही लाल चंदनाचा वापर करू शकता. लाल चंदनामुळे पिग्मेंटेशनची समस्या दूर होऊ शकते. यासाठी घरीच फेसपॅक तयार करा आणि चेहऱ्याला लावा. याशिवाय तुम्ही ज्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये रक्तचंदनाचा अर्क मिसळला आहे तेही वापरू शकता.

पिंपल्स होतील दूरअनेकांना चेहऱ्यावर मुरुम होण्याची समस्या असते. कालांतराने त्यांचे रुपांतर काळ्या डागात होते अशा स्थितीत तुम्ही लाल चंदनाचा वापर करून या समस्येला मुळापासून दूर करू शकता. यासाठी एक चमचा लाल चंदन पावडर, चिमूटभर कापूर आणि एक चमचा हळद गुलाब जलमध्ये घालून त्याची पेस्ट तयार करा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्रभावित भागावर लावा. त्यानंतर सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय नियमित केल्याने पिंपल्सची समस्या दूर होऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह