शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाळी वेळेवर येत नसेल तर 'ही' असू शकतात कारणं, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 17:25 IST

मासिकपाळी ही महिलांना महिन्यातून एकदा येते असं जरी असलं तरी याबाबतीत अनेक समस्यांचा सामना दर महिन्याला महिलांना करावा  लागतो.

मासिकपाळी ही महिलांना महिन्यातून एकदा येते असं जरी असलं तरी याबाबतीत अनेक समस्यांचा सामना दर महिन्याला महिलांना करावा लागतो.  पाळीची जी तारीख असते त्यावेळीच पाळी येते असं नाही. अनेकदा महिलांना पाळी येण्यासाठी उशीर होतो.  साधारणपणे तारखेच्या ५ दिवसांपासून १० दिवसांपर्यंत कधीही कोणत्याही तारखेला पाळी येते. अशा खूप कमी महिला आहेत ज्यांची मासिक पाळी वेळेवर येते.  शरीरात झालेल्या हर्मोनल बदलामुळे गर्भाशयाच्या आतल्या  भागातून रक्तस्त्राव होत असतो. पण ज्यावेळी तुम्हाला  मासिक पाळी उशीरा येते. त्यावेळी ही गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मोठे आजार सुद्धा उद्भवण्याची शक्यता असते.  चला तर मग जाणून घेऊया पाळी उशीरा आल्यास काय आहेत कारणं.

मुलींना ११ ते  १२ वर्ष वयात पाळी यायला सुरूवात  होते. तसंत ४५ ते ५५ वयात पाळी येणं बंद होतं. त्यानंतर स्त्रिया मुलं जन्माला घालण्यासाठी सक्षम नसतात. २८ दिवसांनी मासिक पाळीची सायकल रिपिट होत असते.  काही मुलींना  ११ ते १२ वर्षाचे असतानाच मासिक पाळी यायला  सुरूवात होते. कदचित पाळी लवकर आल्यामुळे  अनियममित होण्याची शक्यता असते. त्यासाठी  वेळच्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार  करणं गरजेचं आहे. 

तुमचं वजन वाढल्यामुळे किंवा स्थुलता आल्यामुळे मासिक पाळी अनियमित येते. अनेकदा मासिक पाळी अनियमीतपणे येण्याचं कारण  थायरॉइड सुध्दा असू शकतं थायरॉईड ग्रंथीमध्ये संतुलन बिघडल्यामुळे  तुम्हाला समस्या उद्भवू शकते. त्यावेळी  डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

मासिक पाळी उशीरा येण्यामागे आपली खाण्यापिण्याची पद्धत आणि  झोपेच्या वेळा  हे दोन घटक सुध्दा कारणीभूत ठरत असतात.  त्यामुळे जर तुम्हाला पाळी येण्यास उशीर होत असेल तर खाण्यापिण्यात आणि आहार घेण्याच्या पद्धतीत बदल करायला हवा. जर तुम्हाला मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी  उपचार करायचे असतील डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण  बदल करू शकतो.

गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यामुळे सुध्दा ही समस्या उद्भवते. मासिक पाळी उशीरा येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम हा आजार आहे. अशा परिस्थितीत स्वतःउपाय करून वेळ घालवण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास समस्येवर उपचार करता येईल. त्यामुळे  मासिकपाळी अनियमीत येणं थांबू शकतं. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स