पूजावर प्रेक्षकांच्या प्रेमाचा पाउस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 01:54 IST
पोश्टर बॉयज, दगडी चाळ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य करणारी अभिनेत्री पूजा सावंतला हिने अगदी कमी कालावधीत इन्स्टाग्रॅमवर एक लाख चाहत्यांचा टप्पा पार केला.
पूजावर प्रेक्षकांच्या प्रेमाचा पाउस
पोश्टर बॉयज, दगडी चाळ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य करणारी अभिनेत्री पूजा सावंतला हिने अगदी कमी कालावधीत इन्स्टाग्रॅमवर एक लाख चाहत्यांचा टप्पा पार केला. प्रेक्षकांच्या या प्रेमाचा पाउस पाहून पूजा ही थक्क झाली आहे. याविषयी पूजाला लोकमत सीएनएक्सने विचारले असता, पूजा म्हणाली, मला खूप काही सांगायचे पण ते प्रत्यक्ष शब्दांत व्यक्त करता येत नाही.तसेच मायबाप प्रेक्षकांचे हे प्रेम पाहता माझ्यावर अधिक जबाबदारी वाढली आहे. माझ्या पोश्टर बॉयज व दगडी चाळ या दोन चित्रपटांमुळेच आज रसिकांच्या मनात मी जागा निर्माण करू शकले. त्यांच्या या प्रेमाला एवढेच सांगू शकते की, बॉटम हार्ट टू थॅक्स. तसेच चाहत्यांना प्रॉमिस करते की, तुमचा हा विश्वास कधी ही तोडणार नाही. एक कलाकार म्हणून तुमचं मनोरंजन करून माझं कर्तव्य पार पाडेल. तसेच तुझे फॉलोवर्सदेखील मन धागा धागा जोडत करोंडोचा टप्पा पार पाडो यासाठी तुला लोकमत सीएनएक्सच्यावतीने खूप खूप शुभेच्छा.