शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

प्राचीन काळापासून औषधांमध्ये वापरली जाणारा 'हा' मसाला, अनेक गंभीर आजारांवर उत्तम उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 17:06 IST

प्राचीन काळी, ग्रीक आणि इजिप्शियन लोक पुदिना हजारो वर्षे औषध म्हणून वापरत होते. नंतर ती एक विशेष प्रजाती म्हणून ओळखली जाऊ लागली.

पुदिना आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पुदिना अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. पुदिन्यामध्ये अनेक चमत्कारिक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे अॅसिडिटी, अपचन यांसारखे आजार क्षणात बरे होतात. प्राचीन काळी, ग्रीक आणि इजिप्शियन लोक पुदिना हजारो वर्षे औषध म्हणून वापरत होते. नंतर ती एक विशेष प्रजाती म्हणून ओळखली जाऊ लागली.

पुदिन्याची पाने अनेक प्रकारे वापरता येतात. तुम्ही चहामध्ये पुदिन्याची पाने वापरू शकता किंवा कॅप्सूल म्हणून घेऊ शकता. याशिवाय त्याची ऑईल कॅप्सूलही वापरता येते. याचा वापर तुम्ही सौंदर्य टिकवण्यासाठीही करू शकता. तुम्ही ते तुमच्या त्वचेवरही वापरू शकता. चेहऱ्यावर वापरताना, हे लक्षात ठेवले पाहिजे की फक्त काही थेंब वापरावेत. एकाच वेळी जास्त तेल लावणे हानिकारक ठरू शकते.

पोटदुखीत आराम -पुदीना काही वेळा पोटाशी संबंधित आजारांमध्येही खूप आराम देतो. काही संशोधनात असे समोर आले आहे की, पुदिना लहान मुलांमधील पोटदुखी कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. मळमळ आणि उलट्यांचा त्रास कमी करण्यासाठी देखील वापरले जाते.

डोकेदुखीवर आराम -पुदिन्यात मेन्थॉल असते. पुदिन्याच्या गुणधर्मांवरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ते मायग्रेन डोकेदुखीमध्ये देखील आराम देते. पुदिन्याच्या तेलाने कपाळाला मसाज केल्याने तीव्र वेदनांमध्येही आराम मिळतो.

तोंडातील जंतू नष्ट करण्यासाठी -पुदिना केवळ तोंड फ्रेश ठेवण्यासाठीच उपयुक्त नाही तर तोंडाच्या आत असलेल्या जंतूंचा खात्मा करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामुळे दातांवर बॅक्टेरिया तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच्या वापराने दातांची चमक देखील वाढते.

बदलत्या ऋतूत कफ होण्यापासून सुटका -ऋतू बदलत असताना सर्दी आणि कफ होण्याची समस्या असल्यास पुदीन्यामुळेही आराम मिळतो. त्यातील मेन्थॉल गुणधर्म आपल्याला सर्दीमध्ये सहज श्वास घेण्यास मदत करतो.

ऊर्जा वाढवते -जेव्हा तुम्हाला जास्त वेळ काम करावे लागते आणि तुम्हाला थकवा जाणवत असेल तेव्हा पेपरमिंटचा वास घ्या. त्यामुळे तुमची उर्जा वाढते. मात्र, पेपरमिंटचा वास घेतल्याने शरीरात आंतरिक कोणते बदल होतात याबाबत शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत.

बॅक्टेरिया मरतात -शास्त्रज्ञांनी E.coli, Listeria आणि Salmonella सारख्या अनेक जीवाणूंवर पेपरमिंट तेलाची चाचणी केली. चाचणी दरम्यान, असे आढळून आले की पेपरमिंटने या तीनही जीवाणूंची वाढ रोखली. या सोबतच पेपरमिंट स्टेफिलोकोकस ऑरियसला देखील मारू शकते. स्टॅफिलोकोकस ऑरियसमुळे त्वचेचा संसर्ग होतो.

वजन कमी करण्यास देखील मदत होते -शास्त्रज्ञ पेपरमिंटवर सतत संशोधन करत असतात. काही अभ्यासात असे आढळून आले आहे की, त्याचा वापर तुमची भूक मंदावतो. लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तुम्ही पेपरमिंट वापरू शकता, यामुळे तुम्हाला भूक कमी लागेल आणि वजन कमी करण्यात मदत होईल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स