शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

२० वर्षांमध्ये दुप्पट होतील प्रोस्टेट कॅन्सरचे रूग्ण? पुरूषांसाठी चिंताजनक रिपोर्ट, जाणून घ्या लक्षणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 12:06 IST

Prostate Cancer: हा रिसर्च पुरूषांसाठी एक चिंतेचा विषय आहे. कारण प्रोस्टेट कॅन्सर पुरूषांमध्ये होणारा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे.

Prostate Cancer: कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यातील एक कॅन्सर म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर. पुरूषांना वाढत्या वयात होणारा या कॅन्सरच्या रूग्णांची संख्या अलिकडे दिवसेंदिवस वाढत आहे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, प्रोस्टेट कॅन्सर पुरूषांसाठी एक मोठा धोका बनत चाललला आहे. 

आजकालची बिझी लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढतं वय यामुळे प्रोस्टेट कॅन्सरच्या केसेस अधिक वाढत आहेत. हा आजार सामान्यपणे वृद्ध लोकांमध्ये अधिक आढळतो. मात्र, आता तरूणांमध्येही हा आजार दिसून येत आहे. लॅन्सेटमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, पुढच्या २० वर्षांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या केसेसमध्ये मोठी वाढ होऊ शकते. हा रिसर्च पुरूषांसाठी एक चिंतेचा विषय आहे. कारण प्रोस्टेट कॅन्सर पुरूषांमध्ये होणारा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे.

काय सांगतो रिसर्च?

रिसर्चनुसार, येणाऱ्या काही वर्षांमध्ये जगभरात प्रोस्टेट कॅन्सरच्या केसेस वेगाने वाढतील. याचं मुख्य कारण वाढतं वय आणि पुरूषांमध्ये लठ्ठपणा हे कारण आहे. रिसर्चमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, कमी विकसित देशांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या केसेस वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

का वाढत आहे याचा धोका?

- वय वाढण्यासोबत प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढत आहे.

- लठ्ठपणामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका अधिक वाढतो.

- जास्त फॅट आणि कमी फायबर असलेल्या आहारामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका अधिक वाढतो.

- नियमितपणे व्यायाम न केल्यानेही प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो.

- जर तुमच्या परिवारात कुणाला प्रोस्टेट कॅन्सर झाला असेल तर तुम्हालाही याचा धोका असतो.

प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं

प्रोस्टेट कॅन्सरची सुरूवातीला काहीच लक्षणं दिसत नाहीत. पण जेव्हा कॅन्सर वाढतो तेव्हा याची काही लक्षणं दिसू लागतात.

- पुन्हा पुन्हा लघवी लागणे

- रात्री जास्त वेळ लघवीला जावं लागणे

- लघवी करताना त्रास होणे

- लघवीची धार कमी होणे

- लघवीतून रक्त येणे

- लघवी करताना वेदना होणे

कसा कराल बचाव?

- फळं, हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्याचा आहारात समावेश करावा.

- नियमितपणे हलका व्यायाम करा.

- वजन नियंत्रित ठेवा.

- ५० वयानंतर दरवर्षी प्रोस्टेट कॅन्सरची टेस्ट करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcancerकर्करोग