दोघांनी झुंज देत वाचविले प्राण
By Admin | Updated: March 14, 2016 00:20 IST2016-03-14T00:20:52+5:302016-03-14T00:20:52+5:30
जळगाव : चोपडा तालुक्यातील मोरचिडा जंगलात केना फाळ्या पावरा (३५) व रामसिंग नामदेव पावरा (४०) दोघे रा. मोरचिडा ता. चोपडा या दोघांवर बिबट्याने हल्ला केला तेव्हा पळून न जाता दोघांनी एकमेकांच्या मदतीला जाऊन बिबट्याशी झूंज दिली व दोघांचेही प्राण वाचविले.

दोघांनी झुंज देत वाचविले प्राण
ज गाव : चोपडा तालुक्यातील मोरचिडा जंगलात केना फाळ्या पावरा (३५) व रामसिंग नामदेव पावरा (४०) दोघे रा. मोरचिडा ता. चोपडा या दोघांवर बिबट्याने हल्ला केला तेव्हा पळून न जाता दोघांनी एकमेकांच्या मदतीला जाऊन बिबट्याशी झूंज दिली व दोघांचेही प्राण वाचविले. केना पावरा व रामसिंग पावरा हे मोरचिडा येथील रहिवासी. जंगलात जाऊन डिंक काढून तो विकणे व आपला तसेच कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणे हा त्यांचा दिनक्रम. नेहमीप्रमाणे ते शनिवारीदेखील जंगलामध्ये डिंक काढायला गेले. त्या वेळी दोघेही वेगवेगळ्या झाडांवरुन डिंक काढत असताना तेथे केना पावरा याच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्या वेळी साधारण २० मीटर अंतरावर असलेल्या रामसिंगने हे दृष्य पाहताच त्याचा थरकाप उडाला. सहकार्याला संकटात तर सोडून जायचे नाही, मात्र काय करावे हे त्याला सुचेनासे झाले. दगड मारला तर तो केनाला लागेल हीदेखील भीती त्याच्या मनात आली. अखेर रामसिंग थेट पुढे सरसावला व केनाची मदत करु लागला. त्यावेळी बिबट्याने रामसिंगवरदेखील हल्ला केला. मात्र केनानेही तेथून पळ न काढता रामसिंग व त्याने दोघांनी मिळून बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. मात्र खवळलेला बिबट्या अधिकच बिथरला. बाजूला असताना तो आपली शेपूट जमिनीवर आपटू लागला घुरघुरू लागला. मागे वळले तर बिबट्या पुन्हा हल्ला करेल या विचाराने दोघांनी पाठ फिरविली नाही. दोघांनी मिळून बिबट्याला हुसकावून लावले व ते माघारी परतले. दोघांपैकी एकानेही तेथून पळ काढला असता तर कदाचित काय अनर्थ घडला असता हे विचार न केलेलेच बरे, असे जखमींच्या नातेवाईकांनी सांगितले. दुसर्यादिवशीही जिल्हा रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू होते.