शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट प्रेग्नेन्सी डिप्रेशन आलंय? चिंता करू नका....हे उपाय करा;डिप्रेशन होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 17:35 IST

मुलं झाल्यावरही स्त्रियांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बरेचदा त्यांच्यावर मानसिक ताण येतो. या मानसिक ताणामुळे डिप्रेशनही येऊ शकते. चला जाणून घेऊया अशावेळी काय करावे?

गर्भवती होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाची बाब असते. त्यामुळे जसे तिच्या शरीरात बदल होतात तसेच मानसिक बदलही होतात. मुलं झाल्यावरही स्त्रियांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बरेचदा त्यांच्यावर मानसिक ताण येतो. या मानसिक ताणामुळे डिप्रेशनही येऊ शकते. चला जाणून घेऊया अशावेळी काय करावे?

अँटीऑक्सिडंट्सअँटीऑक्सिडंट्स डिप्रेशनशी सामना करण्यात भरपूर मदत करतात. काहीवेळा डिप्रेशनमुळे आपल्या मेंदुत नकारात्मक बदल होतात. अशा वेळी अँटीऑक्सिडंट्स या बदलांना सुरळीत करून डिप्रेशन नियंत्रणात आणतात. तुम्ही पिवळ्या, लाल आणि ऑरेंज रंगाच्या भाज्या किंवा फळांचा आहारात समावेश केला पाहिजे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. तुम्ही या रंगाच्या ढोबळी मिरच्याही उपलब्ध असतात त्या खाऊ शकता. तसेच रताळे खाऊ शकता.

आंबवलेले अन्नईडली, ढोसा, आप्पे, ढोकळा याचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा यात मुलं झाल्यानंतर येणारे डिप्रेशन दूर करण्यासाठी महत्वाचे घटक असतात. यामध्ये आंबवण्याच्या प्रक्रियेत जे बॅक्टीरिया असतात त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाण दही, ताक, लस्सी अशा गोष्टीही तुम्ही आहारात समाविष्ट करू शका.

हर्बल मिक्सऑरिगानो, वेलची, केशर असे पदार्थ अशा प्रकारचे डिप्रेशन दूर करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. तुम्ही हे पदार्थ दुध किंवा सॅलड्समध्ये घालून खाऊ शकता. त्यामुळे तुमच्या शरारीतील सेरॉटॉनिन आणि डोपामाईन हे हार्मोन सुरळीतपणे कार्य करतात जे मानसिक ताण दूर करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

सीड्सतीळ, सुर्यफुलाच्या बिया यादेखील मानसिक ताण-तणाव दूर करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. आपण जेव्हा डिप्रेस असतो तेव्हा आपल्याला गोड पदार्थ जास्त खावेसे वाटतात. पण हे आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. त्याएवजी तीळ किंवा सुर्यफूलाच्या बिया खा. तुम्हाला हे फायदेशीर ठरेल.

व्यायामव्यायाम हा डिप्रेशनवरचा सर्वात उत्तम उपाय आहे. व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरात सकारात्मक बदल घडून येतो. आनंदी राहण्यासाठीची जी संप्रेरके आहेत ती उत्तम स्त्रवतात. त्यामुळे तुम्ही सकारात्मक होता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य