पाच लाखासाठी विवाहितेला मारहाण पळ काढून गाठले पोलीस ठाणे : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

By Admin | Updated: May 27, 2016 22:50 IST2016-05-27T22:50:05+5:302016-05-27T22:50:05+5:30

जळगाव : घरासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावे यासाठी अक्सानगरमधील नर्गीसबी अनिस शहा (२१) या विवाहितेला तिच्या माहेरच्या मंडळींनी मारहाण केल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यावेळी तिने पळ काढून पोलीस ठाणे गाठल्याचेही सांगण्यात आले.

Police Station: Threats to try to kill Javed | पाच लाखासाठी विवाहितेला मारहाण पळ काढून गाठले पोलीस ठाणे : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

पाच लाखासाठी विवाहितेला मारहाण पळ काढून गाठले पोलीस ठाणे : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

गाव : घरासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावे यासाठी अक्सानगरमधील नर्गीसबी अनिस शहा (२१) या विवाहितेला तिच्या माहेरच्या मंडळींनी मारहाण केल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यावेळी तिने पळ काढून पोलीस ठाणे गाठल्याचेही सांगण्यात आले.
अक्सानगरमध्ये राहणार्‍या या विवाहितेचे लग्न झाले तेव्हापासून पैशासाठी छळ केला जात असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. विवाहितेच्या पतीला कामधंद्यासाठी तसेच घरासाठी विवाहितेने माहेरुन पाच लाख रुपये आणावे यासाठी तिला त्रास दिला जात होता. त्यामुळे दोन लाख रुपये दिले होते, तरीदेखील छळ सुरूच होता. अशाच प्रकारे शुक्रवारीदेखील तिला मारहाण करण्यात आली. त्यावेळी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र विवाहितेने तेथून पळ काढला व थेट एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले, असे विवाहितेच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Police Station: Threats to try to kill Javed