यशोधराच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करा पोलिसांना टेन्शन : विविध संघटनांची निदर्शने
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:38+5:302015-01-31T00:34:38+5:30
सोलापूर : गरिबांना जीवनदायीचा लाभ मिळालाच पाहिजे, यातील भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, जीवनदायीत समाविष्ट केलेल्या रुग्णांवर उपचार टाळणार्या यशोधराच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, या घोषणांनी जेलरोड पोलिसांचे शुक्रवारी सकाळी टेन्शन वाढले. यशोधरा हॉस्पिटलच्या विरोधात विविध संघटनांनी प्रवेशद्वारावर निदर्शने केली.

यशोधराच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करा पोलिसांना टेन्शन : विविध संघटनांची निदर्शने
स लापूर : गरिबांना जीवनदायीचा लाभ मिळालाच पाहिजे, यातील भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, जीवनदायीत समाविष्ट केलेल्या रुग्णांवर उपचार टाळणार्या यशोधराच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, या घोषणांनी जेलरोड पोलिसांचे शुक्रवारी सकाळी टेन्शन वाढले. यशोधरा हॉस्पिटलच्या विरोधात विविध संघटनांनी प्रवेशद्वारावर निदर्शने केली. जीवनदायी योजनेचे लाभार्थी असतानाही घोळ घालून, बिले वसूल करणार्या यशोधरा हॉस्पिटलच्या विरोधात एस. एफ. आय., डी. वाय. एम. आय. जनवादी महिला संघटना, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र विकास आघाडी, निर्मिती विचार मंच या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी प्रवेशद्वारावर निदर्शने केली. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी व त्यांच्या हातातील फलकांमुळे लक्ष वेधले गेले. सुभाष म्हमाणे यांच्यावरील उपचार जीवनदायीत समाविष्ट असतानाही यशोधराच्या प्रशासनाने बेड शिल्लक नाहीत, आजार योजनेत बसत नाही असे कारण सांगून बिल वसूल केले. वास्तविक हॉस्पिटल धर्मादाय तत्वावर चालविण्याच्या अटीवर शासकीय जागा घेतलेली असताना यशोधरा प्रशासनाने व्यवसाय थाटला आहे. म्हमाणे यांना न्याय मिळालाच पाहिजे व जीवनदायीच्या रुग्णांना वेठीस धरणार्या डॉ. सुरेश मणुरे व हॉस्पिटलच्या प्रशासनावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. या मागणीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर आंदोलन झाल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. अत्यावश्यक सेवेत ही बाब येत असल्याने अत्यवस्थ रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी आंदोलन थोडक्यात उरकावे अशी पोलिसांनी कार्यकर्त्यांना विनंती केली. कार्यकर्त्यांनी विनंतीला मान देत आंदोलन उरकले. आंदोलनात एसएफआयचे राज्य सचिव दत्ता चव्हाण, जिल्हाध्यक्ष अशोक बल्ला, कॉ. युसूफ शेख, अनिल म्हमाणे, किशोर झेंडेकर, मीरा कांबळे, पूजा कांबळे, दाऊद शेख, बापू साबळे, अमोल केंदळे, विजय हरसुरे यांनी सहभाग नोंदविला. इन्फोशेत गहाण ठेवून उपचारधन्यकुमार गायकवाड (वय ३0, रा. हत्तरसंग, ता. दक्षिण सोलापूर) हे मेंदूला सूज आल्याने उपचारास यशोधरामध्ये दाखल झाले होते. हा आजार जीवनदायीत येत नसल्याचे सांगून अडीच लाख बिल आकारले. नुसत्या ४३ वेळा रक्तचाचण्या केल्या. औषधे रुग्णालयाच्या मेडिकलमधूनच घेण्यास भाग पाडले. शेत गहाण ठेवून त्यांनी बिल भरले. याबाबत भारिप बहुजन महासंघाचे विजयकुमार गायकवाड यांनी तक्रार केली आहे. फोटोओळीजीवनदायी योजनेत समाविष्ट रुग्णांवर उपचारास हयगय करणार्या यशोधरा हॉस्पिटल प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी निदर्शने करताना एसएफआयचे प्रदेश सचिव...