शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नरेंद्र मोदी वापरतात अ‍ॅक्युप्रेशर रोलर; याचे फायदे तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 12:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ममल्लापुरमच्या दौऱ्यावर असताना तेथील समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोदींनी तिथे स्वच्छता अभियानाची सुरुवातही केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ममल्लापुरमच्या दौऱ्यावर असताना तेथील समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोदींनी तिथे स्वच्छता अभियानाची सुरुवातही केली. त्यावेळी त्यांच्या हातात एक लाकडाचा छोटासा डम्बेलप्रमाणे दिसणारी काहीतरी वस्तू होती. पंतप्रधान ती वस्तू आपल्या हातांवर रोल करत होते. अनेक लोकांना ते नेमकं काय होतं ते समजलं नाही. स्वतः पंतप्रधानांनी ट्वीट करून सांगितलं की त्यांना अनेक लोकांनी विचारलं की त्यांच्या हातात असणारी वस्तू नेमकी होती कोणती? मोदींनी अनेकांच्या शंकेचं निरसन करताना तो अ‍ॅक्युप्रेशर रोलर असल्याचे सांगितले. तसेच तो रोलर फार उपयोगी असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

जाणून घेऊया अ‍ॅक्युप्रेशर रोलरच्या फायद्यांबाबत... 

काय आहे अ‍ॅक्युप्रेशरचा सिद्धांत? 

अ‍ॅक्युप्रेशरचा मुख्य सिद्धांत हा आहे की, मानवाच्या शरीराचा प्रत्येक अवयव त्यांच्या हाताच्या तळव्याशी आणि पायांच्या तळव्याच्या एका खास पॉइंटशी जोडलेला असतो. दरम्यान याचा संबंध काय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. या पॉइंट्सला एनर्जी दिली तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतात, असा दावा करण्यात येतो. परंतु ही गोष्ट अद्याप सिद्ध झालेली नाही. 

आजार होतात दूर... 

प्रेशर पॉइंट्सवर एनर्जी दिल्याने ही थेट संबंधित अवयवांपर्यंत पोहोचते आणि समस्यांपासून सुटकाही मिळते. असा दावा करण्यात येतो की, असं केल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होते. 

असा करा वापर... 

पंतप्रधान नेरंद्र मोदीच्या हातात एक अ‍ॅक्युप्रेशर रोलर होतात. या रोलरवर  काही पॉइंट्स होते. जेव्हा तुम्ही दोन्ही हातांमध्ये किंवा पायावर ठेवून या रोलरचा वापर करता. तेव्हा प्रेशर पॉइंट्स अ‍ॅक्टिव्ह होतात आणि शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत ऊर्जा पोहोचते. 

हाताचे प्रेशर पॉइंट्स 

अंगठ्याच्या खालच्या बाजूस तळव्यावर हा प्रेशर पॉइंट असतो. हा तणाव कमी करण्यासाठी आणि भावना नियंत्रित करण्यासाठी हा पॉइंट मदत करतो. वजन वाढविणं आणि डायबिटीस होण्याचं एक मुख्य कारण तणावही आहे. त्यामुळे रोलरने मसाज केल्याने फायदा होतो. 

फायदे 

जर तुम्ही नियमितपणे हात आणि पायांच्या पॉइंट्सवर प्रेशर देत असाल तर तुमचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. जर एखाद्या प्रेशर पॉइंटवर जोर दिल्याने वेदना होत असतील तर समजुन जा की, काहीतरी समस्या आहे. त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

दररोज 5 मिनिटं केल्यानेही होतात फायदे... 

अ‍ॅक्युप्रेशर रोलरमुळे डायबिटीस, स्ट्रेस आणि झोप न येण्याची समस्या, हायपरटेन्शन, हार्टच्या समस्यांमध्ये फायदा होतो. त्यासाठी फक्त दररोज 5 मिनिटं अ‍ॅक्युप्रेशर करा. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स