PM Narendra Modi to start corona vaccination program at 10.30 am on saturday | PM मोदी शनिवारी करणार कोरोना लसीकरण अभियानाचं उद्घाटन, एकाच वेळी 3006 केंद्रांवर टोचली जाणार लस

PM मोदी शनिवारी करणार कोरोना लसीकरण अभियानाचं उद्घाटन, एकाच वेळी 3006 केंद्रांवर टोचली जाणार लस

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने 16 जानेवारीला कोरोना लसीकरण अभियानाला भारतात सुरुवात करतील. हे जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान असेल. यात संपूर्ण देश कव्हर होईल. यावेळी सर्व राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 3006 लसीकरण केंद्रे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पंतप्रधानांशी जोडले जातील. एवढेच नाही, तर या सर्व ठिकाणी साधारणपणे एकाच वेळी लशी टोचल्या जातील. उद्घाटनाच्या दिवशी प्रत्येक सेंटरवर 100 लाभार्थ्यांना लस टोचली जाईल.

हा लसीकरण कार्यक्रम आरोग्य सेवांशी संबंधित फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यासाठी असेल. हा कार्यक्रम विशेषत्वाने, सरकारी आणि खासगी या दोन्ही क्षेत्रांतील फ्रंट लाईन वर्कर्सच्या लसीकरणासाठी चालवला जात आहे.

लसीकरण कार्यक्रमात को-विनचाही वापर केला जाईल. हा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेला एक ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. याच्या सहाय्याने डोस स्टॉक, स्टोरेज तापमान आणि कोरोना लशीसाठी लाभार्थ्यांच्या व्यक्तिगत ट्रॅकिंगचा प्रत्यक्ष वेळ, यांसंदर्भात माहिती मिळेल. एवढेच नाही, तर हा डिजिटल प्लेटफॉर्म लसीकरण सत्रांच्या आयोजनाबरोबरच सर्व स्थरांवर कार्यक्रम व्यवस्थापनाला मदत करेल.

कोरोना महामारी, व्हॅक्सीन रोलआऊट आणि को-विन सॉफ्टवेअरसंदर्भातील प्रश्नांसाठी एक चोवीसतास कॉल सेंटर (1075) देखील सुरू करण्यात आले आहे. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनचे डोस आधीच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत मुबलक प्रमाणात पोहोचवण्यात आले आहेत. यानंतर ते, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सरकारांनी जिल्ह्या-जिल्ह्यांत पाठवले आहेत.

English summary :
PM Narendra Modi to start corona vaccination program at 10.30 am on saturday.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: PM Narendra Modi to start corona vaccination program at 10.30 am on saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.