विमान अपहरण अन् बॉलिवूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 02:31 IST
‘नीरजा’ हा चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. एअरहोस्टेस्ट नीरजा भानोत हिने केलेल्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा चित्रपट सर्वस्तरातून प्रसंशा मिळवित आहे.
विमान अपहरण अन् बॉलिवूड
रान माधवानी दिग्दर्शित व सोनम कपूरच्या मुख्य भूमिकेतील ‘नीरजा’ हा चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. एअरहोस्टेस्ट नीरजा भानोत हिने केलेल्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा चित्रपट सर्वस्तरातून प्रसंशा मिळवित आहे. 1986 साली झालेल्या विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित हा चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते. मुंबई विमानतळावरून न्यूयार्क जाणा-या PAN AM 73 विमानाचे पाकिस्तानातील कराचीच्या एम जिन्ना विमानतळावरून अपहरण करण्यात आले होते. 360 प्रवाशांना वाचविताना 23 वर्षीय नीरजा भनोत शहीद झाली. विमान अपहरणाच्या पाश्वभूमिवर अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. यात मल्यामळ भाषेतील अमिताभ बच्चन व मोहनलाल यांच्या प्रमुख भमिके चा ‘कंधार’ व तामीळ व तेलगू भाषेत प्रदर्शित झालेला नागर्जून अभिनित ‘गगनम’ यांचाही उल्लेख करता येईल. विमान अपहरण या विषयावर सपेशल बॉलिवूड चित्रपट देखील तयार झाले आहेत. जमीन (2003)रोहित शेट्टी दिग्दर्शित हा पहिला चित्रपट होता. अजय देवगन, अभिषेक बच्चन व बिपाशा बसू यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट चांगल्या पटकथेसाठी लक्षात राहतो. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा सरकत जाते. दहशतवादी आपल्या नेत्याला सोडण्याच्या मागणीसाठी विमान अपहरण करतात. या चित्रपटाची कथा डिसेंबर 1999 साली झालेल्या ‘कंधार विमान अपहरणा’वर आधारित होती. हायजॅक (2008)शायनी अहुजा, ईशा देओल व दाक्षिणात्य अभिनेत्री अनुषा यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा हॉलिवूडच्या ‘डाय हार्ट’ या चित्रपटासारखी होती. डाय हार्टप्रमाणे अॅक्शन यात नसले तरी देखील तसा प्रयत्न दिग्दर्शकाने केला होता. सहा दहशतवादी विमानाचे अपहरण करून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रवाशांची हत्या करतात. ‘आयसी 814’ या विमान अपहरणावर या चित्रपट तयार करण्यात आला होता. ये दिल आशिकाना (2002)दिग्दशक कुकू कोहली यांच्या रोमॉटिक-अॅक्शन ‘ये दिल आशिकाना’ या चित्रपटात करण नाथ व जिविका शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा दोन ट्रॅकवर पुढे सरकत जाते. कॉलेजचे रोमॉटिक वातावरण तर दुसरीकडे दहशतवादी करावाया. ज्या विमानातून नायिका प्रवास करीत असते त्याचे अपहरण होते. नायिकेची सुटका करण्यासाठी नायकाची धडपड यात दाखविली आहे.