शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लढ्याला यश! पिंपरी-चिंचवडमधील १०५ वर्षीय आजींनी कोरोनाला हरवलं, अन् झाल्या ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 16:22 IST

CoronaVirus News and Latest Updates : पिंपरी-चिंचवडमधील १०५ वर्ष आजींनी कोरोनावर मात केली असून आता या आजी पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. 

कोरोना व्हायरसने गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात कहर केला आहे. या कालावधीत अनेक गंभीर प्रसंगाचा सामना करावा लागला. कोरोना व्हायरसने जगभरातील लाखो लोकांचा जीव घेतला. यात आधी गंभीर आजार असलेल्या तसंच जास्त वय असलेल्या लोकांचा समावेश होता. अशा स्थितीत खूप कमी लोक असे होते. ज्यांनी यशस्वीरित्या कोरोनाचा सामना केला आणि ठणठणीत बरे झाले. अशीच सकारात्मक माहिती समोर येत आहे. पिंपरी-चिंचवडमधील १०५ वर्ष आजींनी कोरोनावर मात केली असून आता या आजी पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. 

१०५ वर्षीय आजींचे नाव शांताबाई गणपत हुलावळे असून त्यांच्या कुटुंबातील चौघा जणांना कोरोनाची लागण झाली होती. लक्षणं दिसत असल्याने आजींचीही कोरोनाची चाचणी करण्यात  आली. रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना वाकडमधील एका रुग्णालयात भरती करण्यात आलं होत. या रुग्णालयात आजींवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आजींना रेमडिसिव्हरची इंजेक्शन देण्यात आली. त्यानंतर काही दिवसातच आजींची प्रकृती सुधारू लागली. आजींच्या शरीरानं उपचाराला प्रतिसाद दिला. 

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या रूपानं केला कहर; आणखी एका देशात ख्रिसमसचे कार्यक्रम रद्द होणार

१५ दिवसांचे उपचार पूर्ण झाल्यानंतर आजाींना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. डॉक्टरांनी सुद्धा आजींचे कौतुक करत अभिनंदन केले. सध्या आजींची प्रकृती उत्तम असून त्या सगळ्यांशी गप्पा मारत आहेत. सोशल मीडियावर या आजींचे खूप कौतुक होत आहे. 

शांताबाई यांचे नातू शायमराव हुलावळे यांनी सांगितले की,'' आजींची स्मरणशक्ती चांगली असून आजी रोज चांगला आहार घेतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळेच आजी कोरोनावर मात करू शकल्या. '' आजींना कुटुंबासोबत गप्पा गोष्टी करायला खूप आवडतं. कोरोनाच्या संक्रमणादरम्यान जे काही झालं. तो अनुभव आजी सगळ्यांना सांगतात. चिंताजनक! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या ताण-तणावात वाढ; तज्ज्ञांनी सांगितली 'ही' कारणं...

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या